Breaking News

Tag Archives: काँग्रेस

कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाची होळी करा एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना विजय वडेट्टीवारांचे आवाहन

राज्यातील मनुवादी विचारसरणीच्या सरकारनं विविध विभागात कंत्राटी कर्मचारी भरण्याच्या नावाखाली बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवून कंपन्यांना मलिदा खाऊ घालण्याचं काम केलं असून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेऊन मनुवादी सरकार पाच वर्षात खाजगी कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून ३० हज़ार कोटींची लूट करणार असल्याचा आरोप करीत एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांनी कंत्राट नोकर भरती …

Read More »

नाना पटोले यांची टीका, जुमलेबाज भाजपाला असा जुमला दाखवा की… महिला अत्याचार करणारे कौरव व रावणाचे जे झाले तेच भाजपाचेही होणार

भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी भाजपाचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा खर्च कमी करेन, उत्पन्न दुप्पट करेन व पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करेन असे आश्वासन दिले होते. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्हायरल व्हिडिओत दडले काय? अतुल लोंढे यांचा टीका, आरक्षणप्रश्नी शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची घोर फसवणूक

भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. हे सत्तापिपासू असून सत्तेसाठी वाट्टेल ते शब्द देऊन दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर “आपण बोलून मोकळे होऊन जाऊ”, असे म्हणतात यामागे काय दडले आहे? हे …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, सरकारची कंत्राटी नोकर भरती ही सुशिक्षीत तरुणांचे शोषण करणारी कंत्राटी नोकर भरती थांबवा अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु

देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे, सरकारने …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केले भाजपा सरकारचा अन्यायी, अत्याचारी कारभार घराघरात पोहचवा

काँग्रेसचे सरकार असताना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ, डालडा, तेल, साखर मिळत होते पण भाजपाच्या राज्यात रेशनवर धान्यच मिळत नाही. देशात गरीब लोक राहिले नाहीत असे केंद्र सरकार म्हणत आहे. मोदी सरकारने गरीब कुटुंबाला उज्ज्वला गॅस दिला आणि केरोसिन बंद केले, सरकारच्यामते ज्यांच्या घरी गॅस सिलिंडर आहे तो गरीब नाही आणि …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे का ? शेतकरी आत्महत्येवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तर तब्बल ४४ दिवस ओढ दिली. परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे, याची साधी जाणीवही नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडल्यास त्याची …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस…. भाजपाला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला आणा तुम्हाला न्याय देऊ

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात रंगला शाब्दिक कलगीतुरा छत्रपतींचे पुरावे चालत नाही अन् निझामाचे चालतात....

मराठा आरक्षणप्रश्नी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह राज्यातील कुणबी समाजातील सर्वांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला याच मुद्यावरून जालन्यातील आंदोलन आणखी उग्र करत वंशावळीचा मुद्दा काढून टाकण्याची मागणीही करण्यात …

Read More »

जी-२० साठी मोदी सरकारच्या कृत्यावरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र भटक्या कुत्र्यांना बांधले, मार्गावरील झोपडपट्ट्या झाकल्या

आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी-२० देशाच्या राष्ट्रप्रमुखांची दोन दिवसीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमी मोदी सरकारने परिषदेसाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशाची गरीबी आणि रस्त्यावरील भटकी कुत्री दिसू नयेत यासाठी दिल्लीत रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांना लपविण्यासाठी लांबलचक पडदा बांधण्यात आलेला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांना जबरदस्तीने पकडून त्यांना जनावरांच्या अॅम्ब्युलन्समधून हलविले जात …

Read More »