Breaking News

Tag Archives: काँग्रेस

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनंतर राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, उद्घाटनाला…. एक फोटो ट्विट करतही मोदींवर काँग्रेसने सोडले टीकास्त्र

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळाही अवघ्या देशातील जनतेने पाहिला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, नेहरुंचे नाव कोट्यवधी लोकांच्या मनातून कसे हटवणार नेहरु नावाची ऍलर्जी असल्यानेच हैदराबादमधील बँकींग संस्थेचे नामकरण

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल अत्यंत घृणा आहे. नेहरु नावाची ऍलर्जीच त्यांना जडलेली आहे म्हणून नेहरुंची सातत्याने बदनामी केली जात आहे. पंडित नेहरु यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असून त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचे नाव …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी मतदारसंघनिहाय बैठका… धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्वबाजूने विचार केला जाणार आहे. धर्मांध …

Read More »

नाना पटोले यांची थेट पोलिस महासंचालकाकडे मागणी, ती पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करा… पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून …

Read More »

विरोधकांच्या बहिष्कारावरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मग ते लोकशाही विरोधी होतं का? मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढला

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपाकडून लोकशाही व संविधानाला धाब्यावर…. कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान: अशोक चव्हाण

भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

अखेर नाना पटोले विरोधक माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे देशमुखांचे पक्ष सदस्यत्व ६ वर्षांसाठी निष्कासित

काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र …

Read More »

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचे राष्ट्रपतींना निमंत्रणच नाही; विरोधक झाले आक्रमक अखेर ठरलं संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर विरोधकांचा बहिष्कार...

२८ मे रोजी देशाच्या नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. मात्र नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींनी करणे अपेक्षित असताना या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संसद भवनाचं उद्घाटन करणार असल्याने १९ विरोधी पक्ष आक्रमक झाले …

Read More »

नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? भाजपाच्या राहुल गांधी यांच्यावरील टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

भारतीय जनता पक्षाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबदद्ल भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे …

Read More »

नाना पटोले यांनी स्पष्ट केले,…. आघाडीतही मेरिटनुसारच वाटप…हे ठराव केले मंजूर काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारच्या निषेधाचे ठराव

विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच …

Read More »