Breaking News

Tag Archives: कोकण

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक

वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्व‍िरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व …

Read More »

मतदार नोंदणी सुरुः गृहनिर्माण सोसायट्यांध्ये मतदान केंद्र उभारणार विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दिलासा, गणेश भक्तांना टोल माफी, पण पासेस या ठिकाणी असा मिळणार कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही …

Read More »

पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी गणेशोत्सव काळासाठी राज्य सरकारचा निर्णय

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते …

Read More »

हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज

मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …

Read More »

चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार १ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित …

Read More »

कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार या निर्णयाचा फायदा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस

महाराष्ट्रातील वैभववाडी-कोल्हापूर या ३४११.१७ कोटी रुपये खर्चाच्या पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रस्तावित रेल्वे मार्गाची शिफारस, ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या (एनपीजी) बैठकीत करण्यात आली. उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाबाबत शिफारस करण्यात आली. या बैठकीत तीन रेल्वे प्रकल्प …

Read More »

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ …

Read More »

कोकण, पश्चिम घाट माथ्यावरील भात शेतीच्या नुकसानीचा आढावा घ्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कोकणातील तसेच पुणे,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागात अतिवृष्टी, पुरामुळे भातशेतीचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कटले असल्याने राज्य शासनाने या भागातील भातशेतीची पाहणी करून आवश्यकतेनुसार तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी पावले उचलावीत , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात भांडारी यांनी मुख्यमंत्री …

Read More »

कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व …

Read More »