Breaking News

Tag Archives: चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडविली खिल्ली, दहा मुख्यमंत्री असलेली पार्टी… मुख्यमंत्री पदासाठी विठुरायाकडे जातायत..

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या प्रमुख नेत्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे लोण काँग्रेसमध्येही पसरले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचेही त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने उध्दव ठाकरे यांना पुन्हा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याचे मोठं विधान, ती भेट….पंकजा मुंडे राष्ट्रवादीत

राज्याच्या राजकारणातून भाजपांतर्गत काही नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात ओबीसी नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मागील काही महिन्यांपासून सातत्याने पंकजा मुंडे यांना डावलण्याचा आणि त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची चांगलीच घुसमट होत असल्याची चर्चा राजकिय …

Read More »

संजय राऊत म्हणाले,…तर २४ तासात देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे शिवसेनेत…

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे, उपनेते शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी उधाण आले. या घटनेचा धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हीही उद्या सत्तेत आल्यानंतर ईडी-सीबीआयचा वापर सुरु केल्यानंतर २४ तासात देवेंद्र फडणवीस …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा युक्तीवाद,… अजित पवार यांच्यावरील गुन्हे ही कमी झाले

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. तसेच मोहित कंबोज यांनी कर्ज फेडले नसल्याविषयीच्या काही जाहिराती बँक ऑफ बडौदा आणि अन्य काही राष्ट्रीयकृत बँकांनी प्रसारमाध्यमात दिल्या होत्या. या कथित बँक घोटाळाप्रकरणात सीबीआयनेच कंबोज यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील क्लोजर रिपोर्ट नुकताच न्यायालयात सादर करत क्लीनचीट दिली. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,… उद्धव ठाकरेंशी आम्ही चर्चा करणारच नाही

भाजपा आणि शिंदे गटात जाहिरातीवरून तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात असतानाच भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्याने शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मोदी@ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी मौर्य यांनी उद्धव ठाकरे …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात ?

भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत. भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता महागाईने एकवेळचे जेवणही करु शकत नाही आणि भाजपा नेते मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण मागवून टिफीन बैठका घेण्याची …

Read More »

त्या जाहिरातीवरून अजित पवार यांचे खुले आव्हान, तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर…मैदानात या

आता शिवसेना आमचीच अशाप्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला. परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अजित पवार पुढे म्हणाले की, तुम्ही जनतेला आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच शिवसेना पुढे घेऊन …

Read More »

लाठीचार्जवरून विरोधकांचा फडणवीसांवर, तर भाजपाचा उद्धव ठाकरें आडून पलटवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळातील घटना

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप होतो आहे. त्यावरुन विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. या आरोपावरून सत्ताधाऱ्यांकडून आता असा प्रकार घडलेला नाही. विरोधक राजकारण करत आहेत, खरंतर अशा गोष्टींचं राजकारण करायचं नसतं तरीही ते केलं जातं आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया देत सरकारची बाजू …

Read More »

जाहिरातीतील ‘त्या’ योजनेची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली अमित शाहसमोर मुलगी झाल्यास कुटुंब होणार लखपती

गृहमंत्री अमित शाह यांची आज नांदेड शहरामध्ये जाहीर सभा झाली. त्यानिमित्ताने गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी भाजपच्या योजना जनसामान्यांच्या कशा फायद्याच्या आहेत. तेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. भाजप सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी त्यांनी केंद्र आणि राज्य …

Read More »

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून या प्रमुखांवर मतदारसंघाची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे , असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »