Breaking News

Tag Archives: दीपक केसरकर

मुंबईत सरकत्या जिन्यासह असलेल्या पहिल्या पादचारी पुलाचे लोकार्पण मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज (दिनांक १५ जुलै २०२३) करण्यात आले. मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक सुविधा देऊन जगातील अग्रेसर व सुलभ शहर बनवण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे उद्गार यावेळी …

Read More »

अजित पवारांना अर्थ खाते दिल्यानंतर शिंदे गटाच्या या मंत्र्याने व्यक्त केली प्रतिक्रिया दीपक केसरकर म्हणाले, हे युतीचे सरकार

महाविकास आघाडीचे सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी देण्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत तेव्हाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांना शिंदे गटाचा विरोध पत्करून पुन्हा अर्थ खाते दिले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची काय प्रतिक्रिया …

Read More »

विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सूचना

पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना देखील मिळणार मोफत गणवेशासोबत बूट, पायमोजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या शालेय मुलांना देखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मोफत गणवेशसोबतच दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्यात येतील. या निर्णयामुळे मागास व दारिद्रय रेषेखाली विद्यार्थ्यांप्रमाणेच दारिद्र्य रेषेवरील विद्यार्थ्यांना मोफत …

Read More »

केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ?

सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा …

Read More »

सरकारची मोठी घोषणाः सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग

शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प देशातील एकमेव महाराष्ट्रात महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर

“कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन, मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार देणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'

मुंबईतील धारावी परिसरात सुमारे २५० दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

दहावी निकालात कोकण पुन्हा अव्वलः तर मुलींची टक्केवारी अधिक शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन- दीपक केसरकर

दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईसह राज्यातील महापालिका व यंत्रणांना दिले ‘हे’ आदेश नालेसफाई ते उपकरणे, औषध साठा अशा विविध बाबींच्या तयारीचा मान्सून पूर्व आढावा

एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय …

Read More »