Breaking News

Tag Archives: देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांचा मोदींना टोला, कदाचित देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसतय १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांचा टोला

राज्यात आणि देशात काही इंग्रजी शाळा आहेत. त्या शाळांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच केंद्रात बसलेल्या ज्या विचाराचे सरकार आहे त्यांच्याकडून असे काही निर्णय घेतात की समाजात आणि धार्मिकस्तरावर अशांतता निर्माण होते. तशा निर्णयामुळे मणिपूरही दोन महिन्यापासून जळत आहे. मात्र मणिपूरला जाण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. उलट लाल …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत

मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत …

Read More »

त्या टीकेवरून अजित पवार यांचा सवाल, आम्ही दोघे काय मुर्ख आहोत का? नाना पटोले यांच्या त्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप

नुकतेच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वॉर रूमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असल्याची टीका केली. त्यावरून अजित पवार यांनी पुण्यातील चांदनी चौकातील पूलाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न …

Read More »

१५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस जाणार या जिल्ह्यांमध्ये… धनंजय मुंडे आणि धर्मराव आत्राम वगळता राष्ट्रवादीचे बहुतांष मंत्री विदर्भात

देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे महत्व जाणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संबधित पालकमंत्र्याने ध्वजारोहण करावे अशी प्रथा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अद्यापही पुरेशा मंत्र्यांची वाणवा आहे. त्या पार्श्वभूमीवर ३६ जिल्ह्यांपैकी …

Read More »

अखेर ईडीने विरोध न केल्याने नवाब मलिक यांना मिळाला जामीन सर्वोच्च न्यायालाने केला जामीन मंजूर

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यापारातील गुन्हेगारांशी संबध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहिण असलेल्या हसिना पारकर हिच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी कुर्ला येथील गोववाला कंपाऊड येथील मालमत्ता स्वस्तात खरेदी केल्याचा आणि या मालमत्ता खरेदीतील पैसा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरी इच्छुक युवकांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी रुपये देणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि …

Read More »

आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी …

Read More »

… देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

“देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती

अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी …

Read More »

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ …

Read More »