Breaking News

Tag Archives: देवेंद्र फडणवीस

हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती

नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. पंतप्रधानांनी राष्ट्रीय …

Read More »

अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता कोणाची विकेट पडली.. शरद पवार यांचे नाव न घेता केला पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांचा …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले, जे गेले ते ईडीच्या भीतीने… अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अनेक जण ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर शरद पवार असे दिलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज जे काही अजित पवारांनी केलं ते काही मला नवीन नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील हे सगळे जण सोडून गेले आहेत. पुढच्या दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल पण मी …

Read More »

अजित पवार यांच्या आडून भाजपाने केला मुख्यमंत्री शिंदेचा ‘गेम’? शिंदे गटातील संभावित मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा लटकणार

राज्यात एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड घडवून आणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना वेगळे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाने स्थापन केले. या सरकार स्थापनेलाही एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना अद्यापही जनतेतून सहानभूती आणि पाठिंबा मिळविता आला …

Read More »

राज्याच्या राजकारणात भाजपाच्या चार ‘भ’ चा पुन्हा एक बळीः अजित पवारांची बंडखोरी शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांसह राष्ट्रवादीतील बडे नेतेही भाजपाच्या वळचणीला

२०१४ साली महाराष्ट्रासह देशात भाजपाप्रणित सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरातच निवृत्त होणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने त्यावेळच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले होते की, देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजपा सरकार म्हणजे भाषण, भ्रम, भ्रमंती आणि भय या चार भ च्या आधारे चालणारे सरकार असून यांच्या काळात चार भ शिवाय काहीही …

Read More »

संजय राऊत यांचा घणाघात, दिल्लीचे दोन बोके आणि ४० खोके… पंतप्रधान मोदींसह शिंदे गटावर हल्लाबोल

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत असलेल्या मुंबईतील कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आज शनिवारी मुंबईत महामोर्चाच आयोजन करण्यात आलं. या मोर्च्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, … ईडी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस सरकार त्याची दखल घेताना दिसत नाही. बुलढाण्याजवळ खाजगी बसला अपघात होऊन २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, हा अपघात नसून सरकारी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार २६ जणांचा लागलेल्या आगीत मृत्यू, देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस

समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० जून) रात्री दोन वाजता अपघात झाला. या अपघातात २६ जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले, पाच-सहा लाख देऊन प्रश्न सुटणार नाहीत… समृध्दी महामार्गावरील सततच्या अपघातावरून राज्य सरकारला सल्ला

समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फक्त अपघातील मृतांच्या नातेवाईकांना चार-पाच लाख रूपये देऊन प्रश्न सुटणार नाही तर रस्ते तज्ञांना बोलावून याची …

Read More »

समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू आठ जणांनी स्वतःचे प्राण वाचविले तर आठ जण जखमी

समृध्दी महामर्गावरील अपघाताची मालिका सातत्याने सुरुच असून शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर राज्यभर हळहळ …

Read More »