Breaking News

Tag Archives: नरेंद्र मोदी

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी भावाला घरातून हाकलून दिले

नुकतेच शिवसेना उबाठा गटाचे नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची प्रवृत्ती असल्याचे बोलले. औरंगजेबाची प्रवृत्ती खरे तर उद्धव ठाकरे यांच्यातच असून सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी सख्या भावाला घरातून बाहेर काढले. वडिलांना कैदेत ठेवल्याचा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. गडचिरोलीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात …

Read More »

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक; मोदींच्या पराभवाला सुरुवात? काँग्रेसनंतर थेट लोकनियुक्त सरकारच्या मुख्यमंत्र्याला हात घातला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ मार्च रोजी अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याच्या काही तासांनंतर, विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगेच अटक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणणे हा देशद्रोह

देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर वाढविणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करणे हा देशद्रोह आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि काश्मिरमधिल ३७० कलम रद्द करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हा देशाचा अपमान असून …

Read More »

राहुल गांधी यांच्या त्या विधानावरून पंतप्रधान मोदींचा निशाणा; टीएमसीकडून तक्रार दाखल

लोकसभा निवडणूकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात या रणधुमाळीचा धुराळा अद्याप उडायला सुरुवात झालेली नसली तरी दक्षिण भारतातील केरळ, तामीळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात झालेली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मेव्हणीने सीता सोरेन यांनी झारखंड …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना …

Read More »

कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शनिवारपासून लागू ४ हजार ६०० प्रति टन वरून ४ हजार ९०० वर पर्यंत वाढवला

नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी १५ मार्च क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स १६ मार्चपासून लागू केला असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली. अधिकृत सरकारी आदेशानुसार, क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स ₹४,९०० प्रति टन करण्यात आला आहे, जो पूर्वीच्या ₹४,६०० च्या दरापेक्षा वाढला आहे. विशेष म्हणजे, डिझेल, पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन …

Read More »

संजय राऊत यांचे मोदी आणि आयोगावर सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर आणि विद्यमान केंद्रातील भाजपाला २०२४ च्या निवडणूकीत काहीही करून ४०० पार लोकसभा निवडणूकीचा टप्पा पार करायचा असल्याची घोषणा दिली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या माध्यमातून कथित इलेक्टोरल बॉण्डमधून कोणत्या राजकिय पक्षाला किती निधी मिळाला याची गुप्त माहितीही बाहेर आली. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशातील लोकसभा …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, …लस बनविणाऱ्या सिरम कंपनीकडून मोदींना कोट्यावधीचा…

नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती असा गंभीर …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, … आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, भूखे मर जावो!

देशातील ८८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका, प्रशासनासह सर्वच क्षेत्रात अत्यंत कमी आहे. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण ते ओबीसी नाहीत, ते जनरल कोट्यातले होते, गुजरात सरकारने कायदा बदलला त्यानंतर ते ओबीसी झाले. पण महत्वाचा प्रश्न आहे की, नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय …

Read More »

जयराम रमेश यांचा हल्लाबोल इलेक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार… ‘चंदा दो, धंदा लो’

इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे मिळाली त्या …

Read More »