Breaking News

Tag Archives: नरेंद्र मोदी

राहुल गांधी यांची टीका, मोदींनी तरूणांना मोबाईल बघण्याचा रोजगार दिला

काही दिवसांपूर्वी देशातील दोन तरूणांनी संसदेत उडी मारली. हे दोन तरूण कसे संसदेत आले याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नाही. पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे ती राहुल गांधी यांनी व्हिडिओ शुट केल्याची. १५० खासदारांना निलंबित का केले असा प्रश्न कोणी विचारत नाही अशी टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी …

Read More »

संसद सुरक्षेच्या मुद्यावरून निलंबित खासदारांचे आंदोलन सुरुच

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद न देता निवेदन अद्याप केले नाही. उलट विरोधकांच्या गैरहजेरीतच राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज चालविले जात आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील दोन्ही सभागृहाच्या निलंबित सदस्यांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर लोकशाही वाचवा अशी मागणी करणाऱे फलक …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा टोला, …या निमित्ताने अघोषित आणीबाणी अनुभवली

कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माझे आणि आमच्या सहकाऱ्यांचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद

आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील अनेक लाभार्थ्यांशी संवाद …

Read More »

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल. नाशिक आणि पुणे विमानतळांचा या योजनेत समावेश झाल्याने …

Read More »

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, …शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध

भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात …

Read More »

तीन राज्यात विजयीः नागपूरात मात्र मोदी-फडणवीस यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्याची उपस्थिती विकसित भारत संकल्प यात्रेचा उत्साह फक्त भाजपाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांमध्येच

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने जिंकली. यात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अनेक राजकिय अभ्यासकांच्या अंदाजाला चुकवित भाजपाने एकहाती सत्ता आणली. त्यामुळे देशात अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा करिष्मा असल्याचे निवडणूक निकालाने सिध्द करून दाखविले. परंतु महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेल्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदींची गॅरंटी … गुन्हेगारीत २ ऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’

कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र व मुंबईचा आजवर मोठा नावलौकिक होता, याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलंक लावला आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (NCRB) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महिला अत्याचार, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महिलांसाठी देशात सर्वात सुरक्षित असलेले मुंबई शहर आता महिला अत्याचारांमध्येही दुसऱ्या क्रमांकावर आहे. …

Read More »

तेलंगणातील पराभवावर पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमच्या सेवेत कोणतीही…

तसे पाह्यला गेलं तर कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीशील परंपरेत खंड पडला नाही. राजस्थान आणि छत्तीसगड येथील काँग्रेसची सत्ता भाजपाने हिसकावून घेतली. तसेच मध्य प्रदेशमधील शिवराज सिंग चौव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची सत्ता ऐतिहासिक विजय मिळवित कायम राखली. मात्र काँग्रेसला तेलंगणा राज्यात मिळालेला विजय …

Read More »

…पंतप्रधान मोदी यांनी तीन राज्यांसोबत मुंबईतल्या वार्डातील जनतेशीही साधला संवाद

विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित …

Read More »