Breaking News

Tag Archives: नाना पटोले

नाना पटोले यांची मागणी, विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन, अधिवेशन संपताच स्थापन करू

विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, …शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, इर्शाळवाडी घटनेत ५ लाखांची मदत अत्यल्प; गावांचे पुनर्वसन करा सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इर्शाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इर्शाळवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, दरड कोसळून शेकडो लोक… वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता ? माधवराव गाडगीळ समितीची अंमलबजावणी आजपर्यंत का झाली नाही?

रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात नाहीत. कोकणात याआधीही अशा दुर्घटना घडल्या पण त्यातून बोध काहीच घेतलेला दिसत नाही. इरसाळवाडी दुर्घटनेने …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, कृषीकर्ज व बियाणांसंदर्भात राज्य सरकारकडून चुकीची माहिती कृषी मंत्र्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?

राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून …

Read More »

बियाणे-खते-खरीप पीक कर्जप्रश्नावरून काँग्रेसने मंत्री मुंडे यांना घेरत केला सभात्याग अखेर अर्थमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत दिले उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास पुकारण्यात आला. यावेळी राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांच्या किंमतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करण्यात येत असल्याची प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस सदस्यांच्या प्रश्नासमोर मंत्री धनंजय मुंडे यांना …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण सीबीआय, ईडीची भिती दाखवून लोकांना ब्लॅकमेल करण्याचे भाजपाचे षडयंत्र

भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे योग्य होईल. परंतु दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांच्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार राज्यात कॅसिनो सुरु करून तरुणांना बरबाद करण्याचा भाजपा सरकारचा डाव

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे. राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात… काँग्रेसची लढाई भाजपा सरकारविरोधात; जे पक्ष साथ देतील त्यांना बरोबर घेऊन लढणार

पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची त्यांना चाड नाही. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, यासह जनतेच्या महत्वाच्या …

Read More »

…राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांनी केली मागणी राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी

राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी …

Read More »