Breaking News

Tag Archives: नाना पटोले

नाना पटोले यांचा सवाल, …आरक्षणप्रश्नी गर्जना करणाऱ्या फडणवीसांनी १० वर्षे काय केले? महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत, सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो अशी वल्गना केली होती पण १० वर्ष केंद्रात व राज्यात …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, …महाभ्रष्टयुती सरकारची चार्जशिट प्रसिद्ध करणार राजीव गांधीच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून २० ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व …

Read More »

नाना पटोले यांची टीका, … अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली मागासवर्गीय, दलित, वंचित, शोषितांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना त्रास देणे ही प्राचीन काळापासूनची मनुवाद्यांची कुप्रथा

सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कट्टीबद्ध आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, गाफील राहु नका लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा

भाजपा धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका …

Read More »

नाना पटोले यांचे आव्हान, पुरावे आहेत तर कारवाई करा फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे. फडणवीस हे ७.५ वर्ष गृहमंत्री पदावर आहेत, त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे काही व्हीडीओ व ऑडिओ क्लिप्स आहेत असा …

Read More »

विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत काँग्रेसची १० सदस्यीय समिती स्थापन महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करणार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चेला महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने १० सदस्यांची समिती स्थापन केली. त्यापैकी ३ सदस्य मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. या समितीचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार …

Read More »

नाना पटोले यांचे आव्हान,… क्लिप आहेत, मग कारवाई करा, धमक्या कसल्या देता भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ईडी, सीबीआयकडून कारवाई.

भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड आहे. ज्यांनी भाजपाची ऑफर स्विकारली ते पवित्र झाले व ज्यांनी नाकारली त्यांच्यावर यंत्रणाच्या माध्यमातून कारवाई करुन जेलमध्ये टाकण्यात आले. आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारडे पैसे, पण शेतकऱ्यांसाठी नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याची घोषणा, काँग्रेसच्या न्यायपत्रातील सरकार टिकवण्यासाठी बिहार आंध्र प्रदेशला मुक्त हस्ते निधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते. देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांना दिलासा …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मोदींना ‘नमस्ते सदावत्सले’ ‘राष्ट्रगीत’ बनवायचे आहे का? विशाळगडाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे २० जून रोजी रायगडावर विधान

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही म्हणून ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे …

Read More »