Breaking News

Tag Archives: नाना पटोले

काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी, …राष्ट्रपती राजवट लागू करा पवईतील भीमनगर झोपडीपट्टीवरील कारवाई सरकार, प्रशासन व बिल्डराच्या संगनमताने

राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली, …

Read More »

नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरेंशी… संपर्क होऊ शकला नाही NEET परिक्षाच रद्द करा, परिक्षेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा निकालाचे फेरमुल्यांकन करण्याची काँग्रेसची मागणी

डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, राज्यपालांनी दुष्काळप्रश्नी सरकारला हे आदेश द्यावेत जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची सोय करा, खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावी

राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत असताना त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे पण सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. सरकारचे दुष्काळाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता राज्यपाल महोदयांनी या प्रश्नी लक्ष घालून जनतेला मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांची अवस्था पाहता कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, …

Read More »

रमेश चेन्नीथला म्हणाले,… आता लक्ष्य विधानसभा काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे, एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई …

Read More »

नाना पटोले यांची ग्वाही, दुष्काळात होरपळणा-या जनतेला वा-यावर सोडणार नाही नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना आधार द्यावा

राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून जनता या दुष्काळाने होरपळून निघाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहेत तर जनावरांना चारा नाही. महाभ्रष्टयुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी व जनतेशी संवाद साधावा, …

Read More »

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधींची पदयात्रा व न्यायपत्राचा काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा लोकसभेतील विजयानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टिळक भवन येथे लाडूतुला

खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढून देशभरातील वातावरण बदलले. या पदयात्रेत जनतेने ज्या समस्या राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या त्याच्याच आधारावर काँग्रेसचा जाहीरनामा न्यायपत्र बनवले होते. जनतेने पदयात्रा व काँग्रेसच्या न्यायपत्रावर मोठा विश्वास दाखवत काँग्रेस उमेदवारांना विजयी केले, असे काँग्रेस …

Read More »

नाना पटोले यांचा टीका,… जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर मिळाले

लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, शेतक-यांच्या अडचणीत नॅाट रिचेबल असणा-या सरकारला… गावोगावी शेतक-यांनी सरकारच्या गलथानपणाचा पाढा वाचला

संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शेतक-यांनी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. जनावरांना चारा पाणी नाही. पशुधन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत जगण्याचा संघर्ष करणा-या शेतक-याला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर गेले आहे. मुख्यमंत्री मूळगावी आराम करत आहेत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, जनता दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर पुणे अपघातप्रकरणी एसआयटी चौकशी दिशाभूल करणारी; बगलबच्च्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न

राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक …

Read More »