Breaking News

Tag Archives: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राहुल गांधी म्हणाले, विधेयकातील त्या तरतुदी तुम्ही नाही वगळल्या तर आम्ही वगळू जणगणना झाल्यानंतर आरक्षण कशाला देता ते तर आज आता ३३ टक्के लागू करा

नव्या संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला माझे समर्थन आहे. या विधेयकात सर्वात मोठी गोष्ट हरविली आहे. ती गोष्ट म्हणजे ओबीसी वर्गातील महिलांना यात स्थान देण्यात आले नाही. देशातील सर्वाधिक जनसंख्येने असलेल्या ओबीसी महिलांना यात स्थान नसणे हे ही एक आश्चर्य आहे. तसेच या विधेयकात मला आणखी एक …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, महिला आरक्षण विधेयक २०१० मध्ये मंजूर पण… अनुसूचीत जाती-जमातींना आरक्षण देण्याची त्यावेळी गरज होती

मागील १० वर्षापासून देशात महिला आरक्षणाच्या मुद्यावरून देशात सातत्याने विविध राजकिय पक्षांकडून कधी राजकिय तर कधी सामाजिक स्तरावर चर्चा घडवून आणण्यात येत आहे. महिला आरक्षण विधेयक संसदेतही कधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तर कधी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत मांडल. पण या दोन्ही पंतप्रधानांना संख्याबळामुळे दोन्ही सभागृहात मंजर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,… महिला आरक्षण विधेयकही निवडणुक ‘जुमला’च महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काही नाही

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणुक जुमलाच ठरेल असे दिसत आहे. विधेयकातील तरतुदी पाहता महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काहीही नाही. महिला आरक्षण कायदा झाला …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडताना म्हणाले,… नारिशक्ती बंधन अधिनियम विधेयक सर्व पक्षाच्या खासदारांनी मंजूर करण्याचे केले आवाहन

मागील अनेक वर्षापासून देशात आणि सर्व राजकिय पक्षांकडून सातत्याने महिला आरक्षण विधेयक लागू करण्यासंदर्भात सातत्याने चर्चा करण्यात येत होती. त्यातच काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना राज्यसभेत महिला आरक्षणाचे विधेयक मांडत मंजूर करण्यात आले. मात्र लोकसभेत या विधेयकाला मुहूर्त लागत नव्हता. अखेर संसदेच्या नव्या इमारतीच्या …

Read More »

नव्या संसदेतील पहिल्याच संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी दिले नव्या भारताचे संकेत गणेशचतुर्थी आणि मिच्छामी दुःखड्म

२०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीला सामोरे जायला आणखी कालावधी असताना निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून विशेष अधिवेशन नव्या संसद इमारतीत घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत आज सुरुवात करण्यात आली. यावेळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधित करण्याची परवानगी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशचतुर्थीचे महत्व …

Read More »

राष्ट्रपतींच्या हजेरीविनाच नव्या संसदेच्या कामकाजाचा शुमारंभ पंतप्रधान नरेद्र मोदी, उपराष्ट्रपती धनखड, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला

जून्या संसदेची इमारत गुलामीचे प्रतिक असल्याचे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. नव्या इमारतीतील संसदेत विद्यमान लोकसभेच्या शेवटचे अधिवेशन तरी व्हावे यादृष्टीकोनातून विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. काल जून्या संसदेच्या इमारतीला अलविदा केल्यानंतर आज नव्या संसद इमारतीचा गृहप्रवेश करण्यात आला. मात्र या कार्यक्रमालाही विद्यमान राष्ट्रपती …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त “नमो ११ कलमी कार्यक्रम” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सुभेदारी विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार, …पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान मोदीच खरे घमंडिया मोदी सरकारविरोधात वार्तांकन करणाऱ्या पत्रकार, संपादकांच्या नोकऱ्या कोणी घालवल्या ?

मोदी सरकारचा अजेंडा चालवणाऱ्या काही टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला, त्याच्या मिरच्या भारतीय जनता पक्षाला का झोंबल्या? पत्रकारितेच्या नावाखाली धार्मिक तेढ वाढवण्याचे काम करणाऱ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज वाटत नाही म्हणूनच हा निर्णय घेतला त्यावर भाजपाने आकांडतांडव का करावे? इंडिया आघाडीला भाजपा घमंडिया, हुकूमशाही म्हणत …

Read More »

‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव्’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका

शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ …

Read More »