Breaking News

Tag Archives: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली, अखेर माफी त्याच ठिकाणी दुसरा पुतळा उभारणार

मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा आठ महिन्यातच कोसळून पडला. या पुतळा प्रकरणावरून राज्यातील सर्व राजकिय पक्षांनी सत्ताधाऱांना धारेवर धरायला सुरुवात केली. तसेच या घटनेवरून राजकिय कुरघोडी नाट्याला सुरुवातही झाली. यावरून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माफी मागितली. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी टोचले मोदी यांचे कान, बेटी बचाव नव्हे तर… महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून मोदींना निशाणा

महिलांना संरक्षणाची नाही तर, त्यांना भयमुक्त वातावरण हवे आहे. आपल्या महिलांवर होणारा कोणताही अन्याय असह्य, वेदनादायी आणि अत्यंत निषेधार्ह आहे. आम्हाला ‘बेटी वाचवा’ ची गरज नाही तर ‘बेटीला समान हक्क मिळवून देण्याची’ गरज असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. संपूर्ण …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, …पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागावी पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यावेळी मविआचे निषेध आंदोलन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेचे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते, पण भाजपा युती सरकारला भ्रष्टाचाराची इतकी कीड लागली आहे की त्यांनी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पुतळा पडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारे सरकार…. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी …

Read More »

पाकिस्तानातील बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार? राजनैतिक संबध आणि सुरक्षा आदींच्या प्रश्नावर खल सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या अलीकडील प्रसारमाध्यमांच्या बातम्यांना भारत सरकारने ठामपणे नकार दिला आहे. १५-१६ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या सरकार प्रमुखांच्या परिषदेसाठी (CHG) बैठकीसाठी पाकिस्तानने पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांना निमंत्रण दिल्यानंतर ही अटकळ सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारने महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले टक्केवारीत अडकलेल्या महायुतीच्या भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर

शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला आहे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभा …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, शिवाजी महाराजांच नाव वापरायचं… सन्मानाबाबत घेणेदेणे नाही पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय

मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला मालमणमधील सिंधुदूर्ग किल्याच्या किनारी वसविण्यात आलेला पुतळा

नौदल दिनाचे औचित्य साधत भारतीय नौदलाचे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण येथील सिंधूदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले. तसेच त्यादिवशी नौदलाचे संचलनही झाले. या पुतळा अनावरणास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला नाही तोच हा पुतळा कोसळून पडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पुतळा …

Read More »

पेन्शन योजनेवरून मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, यु म्हणजे मोदींचा युटर्न नव्या युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेवरून सोडले टीकास्त्र

केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना जाहिर केली. या योजनेवरून काँग्रेसने टीकेची झोड उठविली. युपीएस मधील यु म्हणजे मोदी सरकारचा यु टर्न असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. केंद्र सरकाच्या काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मोडतो़ड तांब्या-पितळ सारखी आमची आघाडी नाही महाविकास आघाडीत जागा वाटपांवर ९९ टक्के सहमती

महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे.  मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या …

Read More »