Breaking News

Tag Archives: पंतप्रधान

पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प

भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून …

Read More »

बांद्रा-कुर्ला संकुलातील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा …

Read More »

भाजपाच्या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्याकडून किमान डजनवेळा तरी काँग्रेसचे नाव

भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह देशभरातील भाजपाचे खासदार, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकिय नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, मागील ६५-७० वर्षाच्या काळात काँग्रेसचा एकही पंतप्रधान …

Read More »

काँग्रेसचा आरोप, गांधी-नेहरु विचारधारा संपवण्यासाठी भाजपाकडून…

नरेंद्र मोदी व भाजपा लोकशाहीला संपवण्यासाठी बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर अनेकांना जेलमध्ये जावे लागले. कारण ते लोकशाही, संविधान काहीच मानत नाहीत. आता आपल्यासमोर करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर भाजपा व नरेंद्र मोदी सातत्याने टीका करत असतात त्यामागे गांधी-नेहरुंची विचारधारा संपवण्याचा …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल,… मोदीजी हिंदूत्ववादी दोन्ही नेत्यांना भारतरत्न कधी?

वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या नियमानुसार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत रत्न पुरस्कार फक्त तीन जणांना जाहिर करता येतो. परंतु एकाच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूत्ववादी नेत्यांना वगळून इतर पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मोदींना हिंदूत्ववादी नेत्यांचा …

Read More »

राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर घरी जात केले अभिनंदन

देशातील हिंदूत्ववादी राजकारणाचा आणि अयोध्येतील बाबरी मस्जिदीच्या जागेवर राम मंदिर होता असा दावा करत राम मंदिर उभारणी आंदोलनाचा पाया रचणारे आणि नरेंद्र मोदी यांना राजकिय संधी उपलब्ध करून देणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न जाहिर करण्यात आला. विशेष म्हणजे भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ४०४ ची घोषणा करता मग नितीशकुमार सोबत कशाला

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन नुकतेच झाले. मंदिरातील राम हा काही एकट्या मोदी आणि भाजपावाल्यांचा राम नाही. तर या भारतात राहणाऱ्या करोडो राम भक्तांचा राम आहे. जसा तो तुमचा आहे तसा तो माझाही आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रण आले न आल्याची वाट पाह्यली नाही. पण मी नाशिकमधील काळाराम मंदिरातील रामाची पूजा …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल,… मोदींचे राज्य की औरंगजेबाचे

मागील काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या संजय राऊत यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंदवून तुरुंगवास भोगल्यानंतर आता ईडीने कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना आणि संजय राऊत यांच्या मुलीला ईडीने नोटीस पाठविली. या ईडी नोटीसीवरून संजय राऊत यांनी ईडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर पंतप्रधान एक शब्दही का बोलत नाहीत ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले, पण राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चारवेळा जात आहेत पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे, बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर या …

Read More »

नरसय्या आ़डम पंतप्रधानांच्या उपस्थितीतच म्हणाले, १ लाख लोकांना रोजगार…

सोलापूरातील शहरातील विडी कामगारांना हक्काची घरे मिळावित या उद्देशाने मागील अनेक वर्षे लढा पुकारलेल्या, कम्युनिस्ट पक्षाकडून दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोजगार निर्मितीसाठी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत मिलीटरी कापड निर्मितीची काम दिल्यास येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल …

Read More »