Breaking News

Tag Archives: पियुष गोयल

निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्र हरयाणातील शेतकऱ्यांना असाही खुष करण्याचा भाजपाचा प्रयत्न निर्यातीवरील मार्केट कॅप काढली

हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची तयारी सुरु आहे. यातील हरयाणात सत्ताधारी भाजपाला बाहेरचा रस्ता स्थानिक जनतेकडून दाखविण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची घोषणा होणे अद्याप बाकी असले तरी येथील वातावरणही विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राग भाजपावरील असंतोष कमी करण्यासाठी …

Read More »

पियुष गोयल यांची ग्वाही, उत्तर मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांची कामे… कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार

मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

राज्यसभेच्या १२ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या महाराष्ट्रातील जागांसाठी मतदान

देशभरातील विविध राज्यातून रिक्त होणाऱ्या १२ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडूण गेल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे ही मुंबईतून लोकसभेवर निवडूण गेल्याने त्यांचीही राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या …

Read More »

अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबद्दल शरद पवारांनी माफी मागावी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मागणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयाने तडीपार केले होते,अशी टिप्पण्णी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच केली होती. त्याबाबत बोलताना पियुष गोयल यांनी अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले होते, याकडे लक्ष वेधले. अमित शाह यांना गुंतविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले …

Read More »

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” या मथळ्याखाली एका दैनिकात बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही अज्ञात कार्यकर्त्यांनी संबंधित बातमी देणाऱ्या  महिला पत्रकाराला घरी जाऊन धमकावल्याची धक्कादायक बाब घडली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) येथिल …

Read More »

आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मुंबईतील मिठागरावर भाजपाचा डोळा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . यावेळी मुंबई उत्तर चे लोकसभा उमेदवार, भाजपाचे पीयूष गोयल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘झोपडपट्ट्या शहरातून काढल्या गेल्या पाहिजेत आणि त्या सर्व मिठागरांच्या जमिनीवर हलवल्या जायला हव्यात’, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा आदित्य …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मंत्र्याच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना डांबले

भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांचे चिरंजीव धृव गोयल यांच्या ठाकूर कॉलेज मध्ये कार्यक्रमात संबोधित करायला गेले होते, तेव्हा विद्यार्थ्यांना डांबून बसविण्यात आले त्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांनी रंग पकडतो विद्यार्थी एखादी भूमिका घेतो तेव्हा तेव्हा तेव्हा देशात मोठे बदल झाले असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …

Read More »

स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र टॉप परफॉर्मर…

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला. या क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, कांदा, इथेनॉल बंदीप्रकरणी अमित शाह यांना भेटणार

केंद्र सरकारने पुन्हा एकदा कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज सोलापूर सह नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात घोषणाबाजी करत कांद्याचा लिलाव बंद पाडला. त्याचबरोबर केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी दिलेल्या परवानगीवर बंदी आणली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद सध्या विधिमंडळाच्या …

Read More »

केंद्र सरकारने लाँच केला भारत आटा आणि डाळी २७.५० रुपयांना मिळणार पीठ

गव्हाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सणासुदीच्या काळात पिठाच्या किमतीत झालेली वाढ पाहता सरकारने स्वस्त दरात पीठ आणि डाळी विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार देशभरात २७.५० रुपये प्रति किलो दराने भारत आटा तर डाळी ६० रूपये दराने उपलब्ध करून देणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी, ६ नोव्हेंबर रोजी दिल्लीत …

Read More »