Breaking News

Tag Archives: पुणे

उद्धव ठाकरे यांचा सवाल, अब्दाली शाहचा वंशच, वळ बघायला आला होता का? धनुष्यबाण हटवा, मला मशाल हवीय शाखे शाखेंच्या फलकावर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या मशालीने भाजपाचा पराभव केला. तरीही मध्यंतरी बालेवाडीत एकमेकांच्या पाठीवर पडलेले वळ बघायला अब्दाली शाहचे वंशच इथे आले होते का असा सवाल करत तो अब्दाली शाह तो होता. आताचा अमित आहे हे विसरू नका असे सांगत जशी औरंगजेबाची कबर इथे महाराष्ट्रात बांधली तशी भाजपाची कबरही महाराष्ट्रात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महानगर पालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेत केली घोषणा, पालिका आणि सरकार मदत करणार एकता नगर आणि सिंहगड रोडवरील पाणी साचलेल्या ठिकाणी भेट

काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्रीपासून पुण्यात कोसळलेल्या पावसामुळे पुणे शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली. एकाबाजूला पावसाचे पाणी आणि दुसऱ्याबाजूला खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सिंहगडरोडवरील एकता नगर आणि अन्य भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी जमा झाले. एकता नगरमध्ये तर छातीपर्यंत पाणी जमा झाल्याचे पाह्यला मिळाले. यापार्श्वभूमीवर दुपारनंतर पालकमंत्री अजित …

Read More »

हवामान खात्याने पुढील २४ तासासाठी मुंबईसह या जिल्ह्यांना दिला पावसाचा रेड अलर्ट ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांना दिला पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांष जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. त्यातच मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. तर पुणे शहरात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणि मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे पुण्याच्या अनेक भागात घरांनी पाणी …

Read More »

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची महापालिका, विभागीय आयुक्तांशी चर्चा बचाव आणि मदतकार्यासाठी राज्य प्रशासन आणि राज्य आपत्ती निवारण यंत्रणेनी सतर्क रहावे

मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहू माळी यांनी त्यांना परिस्थितीची …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, पुण्यातील वाहतूकीच्या समस्येसाठी तज्ज्ञ प्रतिनिधींची समिती पुणे शहराचे झपाट्याने नागरिकरण होतेय

शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचे शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक कोंडीमुक्त शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येचा उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, आगामी निवडणूक स्वबळावर पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली भूमिका स्पष्ट

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कशीबशी रायगडची जागा जिंकता आली. आता विधानसभा निवडणूकीला दोन-अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच राज्यातील सर्वच राजकिय पक्षाकडून निवडणूकीची तयारी सुरु केली. त्यातच भाजपाने आज राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात घेत एकप्रकारे विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजवीत प्रचाराचा शुमारंभही केला. इकडे भाजपाचे अधिवेशन पार …

Read More »

पुण्याच्या बैठकीला अजित पवार, शरद पवार हजर, सुप्रिया सुळे-शेळके वाद, कौतुक सुळेंच्या सूचनेचे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एकत्रित हजर

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्रित हजर राहणार असल्याने या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु या …

Read More »

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर वाशिम जिल्ह्यात रूजू वादग्रस्त आरोपांवर कोणतेही भाष्य करण्यास नकार

विशेष सवलती आणि बनावट प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी पूजा खेडकर यांची ११ जुलै रोजी उर्वरित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे येथील त्यांचा प्रोबेशनरी आयएएसचा कालावधी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. तसेच पूजा खेडेकर यांच्या भरतीच्या गोंधळाच्या परिस्थितीची चौकशी करण्याची …

Read More »

हसन मुश्रीफ यांची माहिती, पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली माहिती

पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …

Read More »