Breaking News

Tag Archives: पुणे

पुण्यातील ‘आयुका’चा सहभाग अभिमानास्पद आदित्य एल-१ च्या यशस्वी उड्डाणानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी यशस्विरित्या प्रक्षेपण करून, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी ‘इस्त्रो’ या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री …

Read More »

राजगुरुनगर येथील पंचायत समिती परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर (ता.खेड) येथील पंचायत समितीच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजगुरुनगर (ता.खेड) येथील पंचायत समिती परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय …

Read More »

पुणे येथील वीर धरणबाधितांसाठी प्रस्ताव सादर करा प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याचा प्रस्ताव आराखड्यासह सादर करावा

पुणे जिल्ह्यात नीरा नदीवर बांधण्यात आलेल्या वीर धरणामुळे बाधित झालेल्या खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणेने आराखड्यासह सादर करावा, तसेच राज्यातील याविषयीचे अन्य प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले. खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबत आयोजित बैठकीत …

Read More »

तीन वर्षाचे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ या तिघांना जाहिर क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे सायंकाळी पाच वाजता प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार प्रदान …

Read More »

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक दोन्ही पवारांच्या बैठकींने राजकिय वर्तुळात चर्चेने उधाण

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील या बैठकीला होते. तर, दुसरीडे पुण्यातील चांदणी चौकातील उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, …

Read More »

अमित शाह म्हणाले, अजितदादा हीच तुमची योग्य जागा, तर अजित पवार म्हणाले, …जरा जास्त प्रेम सहकार विभागाच्या पोर्टलच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच मंचावर

समस्त भारतीय आणि विशेषत: भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवर्जून उल्लेख …

Read More »

अजित पवार यांनी उदघाटनवेळी आवाहन करताना म्हणाले, व्यायाम करा, डोळ्यांची काळजी घ्या…. राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. आमदार …

Read More »

दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी गैव्यवहार प्रकरणी चौकशी महसूल मंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चौकशी समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीत होत असलेला गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुनील टिंगरे, राहुल कुल यांनी उपस्थित …

Read More »

‘शासन आपल्या दारी’चा पुणे जिल्ह्यात पहिलाच कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी …

Read More »