Breaking News

Tag Archives: भाजपा

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ पत्र देण्यासाठी दबाव आणला जात होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जमत नसेल तर आदित्य ठाकरे याने दिशा सालियन हिच्यावर बलात्कार केल्याचे शपथपत्र द्यावे असा दबाव आणत नाहीतर तुमच्या विरोधात ईडी लावू असा धाक दाखविला …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा दावा, अर्थसंकल्पातून राज्यासाठी निधी मिळाला संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांकडून एकाबाजूला करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याचा दावा करत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हा अतिशय …

Read More »

दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याची घोषणा, काँग्रेसच्या न्यायपत्रातील सरकार टिकवण्यासाठी बिहार आंध्र प्रदेशला मुक्त हस्ते निधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते. देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांना दिलासा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी, मालेगांव, धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा मतदार याद्या दुरुस्त करताना भाजपाच्या आक्षेपांची दखल घ्या

मतदान केंद्र सुसूत्रीकरण व नवीन मतदान केंद्र तयार करताना अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांच्या याद्या तोडून तेथील नावे दुसऱ्या मतदान केंद्रांमध्ये टाकण्यात येऊ नयेत, मतदान केंद्राच्या ठिकाणीच वाढीव मतदान केंद्र त्याच इमारतीत मंजूर करावे, अशा मागण्या भारतीय जनता पार्टी तर्फे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मोदींना ‘नमस्ते सदावत्सले’ ‘राष्ट्रगीत’ बनवायचे आहे का? विशाळगडाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे २० जून रोजी रायगडावर विधान

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही म्हणून ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे …

Read More »

राहुल गांधी यांचा टोला, शिक्षण मंत्री स्वतःला सोडून सगळ्यांना जबाबदार ठरवतायत पेपर लिक प्रकरणावरून राहुल गांधी आणि धर्मेद्र प्रधान यांच्यात रंगला सामना

सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आरएसएस संविधान विरोधी बंदी हटविण्यावरून आरएसएसवर साधला निशाणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून स्वीकारतो का आणि त्यांना भारताचा राष्ट्रध्वज मान्य आहे का, ते भारतीय संविधानाशी एकनिष्ठ आहेत का? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएस RSS यांच्यावर निशाणा साधत विचारला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर …

Read More »

जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नये भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे. माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शिंदे-भाजपा सरकारने एससी-एसटीचा निधी इतरत्र वळवला भाजपा - काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू

एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी इतरत्र वळवला आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, ते दलित आणि आदिवासी बांधवांच्या विरोधी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »