Breaking News

Tag Archives: भाजपा

प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल, मोदींना देश तोडायचाय…

राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे सूचक विधान, एकाबाजूला चीन अन्…

स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सरकारला आणि भाजपाच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील. नाहीतर लोकशाहीची हुकूमशाही कधी होईल, हे सुध्दा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. भाजपचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, पाहिजे तेवढे …

Read More »

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात सर्वाधिक अग्रभागी बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद सुप्रिया सुळे विरूध्द -भावजय तथा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत होणार आहे. त्यानंतर आता सर्वाधिक रंजक लढत होणार आहे ती माढा …

Read More »

लोकसभा निवडणूक २०२४, प्रचारात कोणते मुद्दे अग्रभागी राहतील

देशातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणूकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसकडून आणण्यात येत असलेल्या प्रचारांचे मुद्दे आणि सीएसडीएस-लोकनीतीने जनतेतील काहीजणांचे मते जाणून घेऊन लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कोणत्या राजकिय मुद्यांचा प्रभाव राहील यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात १०५, दुसऱ्या टप्प्यात ८९, तिसऱ्या टप्प्यात ९४, …

Read More »

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट होणार ऐन निवडणूकीच्या धामधुमीत एप्रिल महिन्यातच भेटण्याचे नियोजन

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी या महिन्यात भारताला भेट देतील आणि देशात गुंतवणूक आणि नवीन कारखाना सुरू करण्याच्या योजनांबाबत घोषणा करतील, असे थेट माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. कोट्यधीश २२ एप्रिलच्या आठवड्यात नवी दिल्लीत मोदींना भेटतील आणि त्यांच्या भारताच्या योजनांबद्दल स्वतंत्रपणे घोषणा करतील, ज्यांनी या दौऱ्याचे तपशील गोपनीय …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंचे एक चांगले काम दाखवा

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा

राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, काल विचित्र योगायोग होता अमावस्या, सुर्यग्रहण…

लोकसभा निवडणूकीची सुरुवात झाली आहे. महाविकास विकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो आहोत. पण निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून पुढे वाटचाल करतो. देशाची राज्यघटना आणि जनतेला असलेले अधिकार अबादीत राखण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. काल जी ही चंद्रपूरात सभा झाली, त्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून टीका …

Read More »

नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, …नरेंद्र मोदी इलेक्टोरल बाँडच्या खंडणीवर गप्प का?

काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप हास्यास्पद असून इतिहासाचा अभ्यास नाही हे स्पष्ट दिसते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश रस्त्यावर उतरला …

Read More »