Breaking News

Tag Archives: भाजपा

राजदचे तीन आमदार गळाला लावत नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत न जाण्याचा निर्धार केलेल्या जनता संयुक्तचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रीय जनता दलाच्या तीन आमदारांना गळाला लावत आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान बिहार विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून पाय उतार होण्यास नकार दिला होता. परंतु बहुमताचा आकडा …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास, एकटा भाजपा ३७० जागा जिंकेल

लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत. तसतसा भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींना धार चढत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आगामी लोकसभा निवडणूकी ४०० जागा मिळणार असल्याचा दावा सातत्याने भाजपाकडून करण्यात येत आहे. तर यातील ३७० जागा एकट्या भाजपाला मिळतील असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, भाजपा-आरएसएसच्या गुंडांना …

महाराष्ट्रात फुले – शाहु – आंबेडकरांच्या विचारांना काही महत्व आहे का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंगवर ट्विट करत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, जय श्रीराम बोल म्हणत कणकवली येथील मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे

पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ च्या समारोप समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास व …

Read More »

भाजपाची कमाई तोबा वाढली, वर्षात १३०० कोटी रूपये

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील १० वर्षाच्या काळात भलेही महागाई, बेरोजगारी आणि देशातील सामाजिक स्थैर्य धोक्यात येत धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढीस लागल्याचा आरोप सातत्याने काँग्रेससह विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या एका वर्षात भाजपाला जवळपास १३०० कोटी रूपयांचा निधी इलेक्ट्रॉल …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, मॉरिसने स्वतःवर गोळी मारून घेतली की कोणी मारली?

महाराष्ट्र आणि मुंबईत सलग झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी राजकिय आणि सामाजिक वातावरण चांगलेच हादरून गेलेले आहे. त्यातच शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुंड मॉरिस याने समेटाच्या निमित्ताने त्याच्या कार्यालयात बोलावून गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाहेर आले. यावरून अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, राज्यघटनेतील प्रस्तावनेची दुरूस्तीपूर्वी….?

राज्यघटनेतील प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द काढून टाकण्याची मागणी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश दिपंकर दत्ता आणि संजीव खन्ना यांनी सवाल करत राज्यघटनेतील प्रस्तावनेची अंमलबजावणी दुरूस्ती करण्यापूर्वी कधी अंमलबजावणी केली आहे का असा सवाल केला. स्वतंत्र भारताची राज्यघटना …

Read More »

अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला, भाजपाने बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आंदोलन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कागदी ओबीसी आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातच्या वर्तमान पत्रांमध्ये ‘उच्चजातीचा’ व्यक्ती मुख्यमंत्री झाला, अशा पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर मोदींनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुणे येथे आले असता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्यावर हल्ला केला. परंतु निखिल वागळे हे त्यांच्या वाहनातच बसून राहिल्याने काही आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा आणि गाडीवर शाईफेक करत रोखण्याचा प्रयत्न केल्याची …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल,… मोदीजी हिंदूत्ववादी दोन्ही नेत्यांना भारतरत्न कधी?

वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या नियमानुसार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत रत्न पुरस्कार फक्त तीन जणांना जाहिर करता येतो. परंतु एकाच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूत्ववादी नेत्यांना वगळून इतर पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मोदींना हिंदूत्ववादी नेत्यांचा …

Read More »