Breaking News

Tag Archives: भाजपा

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांचे मोठे वक्तव्य… तर आम्ही पाठिंबा देऊ ५० टक्क्यांच्या वरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्राने हे धोरण बदललं पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. शरद पवार पुढे …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, तरुणांना नोकरी ऐवजी… भविष्य उद्धवस्त करण्याचा सरकारचा डाव आहे का? शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?

महाभ्रष्टयुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले आहे, राज्यावर ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला असून कर्ज काढून कंत्राटदारांचे खिशे भरणे व त्यातून टक्केवारीची मलई खाण्याचा उद्योग सुरु आहे. सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास पैसे नाहीत. पूरग्रस्तांना मदत करण्यास पैसे नाहीत, बेरोजगांसाठी पैसे नाहीत पण सरकारी योजनांच्या प्रचारासाठी मात्र …

Read More »

धाराशिव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाच्या कामास गती द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

धाराशिव येथील कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तांत्रिक वस्त्र निर्मिती पार्क (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क) उभारण्याच्या कारवाईस गती द्यावी. तसेच या परिसरातील डोंगराळ भागात सोलार प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. धाराशिव जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. यावेळी आमदार राणा जगजीतसिंह पाटील …

Read More »

रावसाहेब दानवे यांचा इशारा,…उद्धव ठाकरेंनी चिथावणीखोर भाषा थांबवावी विधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना नाकारेल

दिल्ली दौ-यामधील पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार अशी वल्गना करत आहेत. मात्र हिंदुत्वाला तिलांजली, सरकारी योजनांमध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न, २०१९ मध्ये जनादेशाचा केलेला अनादर, यामुळे उबाठा सेनेला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी व्यक्त …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले, बांग्लादेशाने दाखवून दिलेय, कोणी स्वतःला देव समजू नये धारावीवरून अदानीला दिला इशारा

मुंबई माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर बांग्लादेशाच्या सद्यपरिस्थितीवरून निशाणा साधला. बांग्लादेशातील सत्तापालटानंतर उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. य दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, …

Read More »

भाजपाचा हर घर तिरंगा अभियान कार्यक्रम राज्य सरकार राबविणार ९ ऑगस्टपासून राज्यात राबवित अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या आमदार आणि हर घर तिरंगा अभियांच्या संयोजिका उमा खापरे यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा राबविणार असल्याचे सांगत या अभियानाची सुरुवात ९ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच राज्यातील किमान १ कोटी नागरिकांच्या घरावर तिरंगा झेडा …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला उध्दव ठाकरे दिल्लीत आरक्षणासाठी गेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे सांगायला गेलेत

उध्दव ठाकरे हे दिल्लीला महाराष्ट्राच्या शेतकरी, महिला, तरुण अथवा मराठा आरक्षण या विषयासाठी गेलेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगायला गेलेत. ते दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत, असा थेट आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »

विधानसभाध्यक्षांनी निर्देश देऊन जयभिम नगरचे रहिवाशी छपराच्या प्रतिक्षेत काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम पक्षाने मुद्दा उपस्थित करूनही अद्याप सरकारकडून निर्णयाची अंमलबजावणी नाहीच

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्याच्या दिवसात कोणत्याही इमारतीवर किंवा वस्तींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आसरा अर्थात निवासी घरावर कारवाई करता येत नाही. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अधिनियमात तशी तरतूदही आहे. तरीही मुंबई महापालिकेकडून पवई येथील जयभिम नगरातील रहिवाशांना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेने कारवाई करत रस्त्यावर आणले. या कारवाईवरून राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …आरक्षणप्रश्नी गर्जना करणाऱ्या फडणवीसांनी १० वर्षे काय केले? महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत, सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो अशी वल्गना केली होती पण १० वर्ष केंद्रात व राज्यात …

Read More »

भाजपातर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘ हर घर तिरंगा ’ अभियान १ कोटी घरांवर तिरंगा लावण्याचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जुलै च्या ‘ मन की बात ’ मध्ये ‘हर घर तिरंगा ’अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती ‘हर घर तिरंगा ’ अभियानाच्या प्रदेश संयोजक आमदार उमा खापरे …

Read More »