Breaking News

Tag Archives: मंत्रालय

मंत्रालयातील स्वेच्छानिवृत्तीनंतर सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा शिवसेना प्रवेश मेहकरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता

राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे असताना मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आता राजकारणाची वाट धरली आहे. मंत्रालयात ३ दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) या पदावर पोहोचलेले सिद्धार्थ खरात यांनी अलिकडेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर आज मंगळवारी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील …

Read More »

कोरोना घोटाळ्याप्रकरणी संशयात असलेल्या इक्बालसिंह चहल यांच्याकडे गृह विभागाची धुरा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडील गृह विभागाचा अतिरिक्त चार्ज काढला

मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कामगिरी बजावत असताना कोरोना काळात झालेल्या घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना चौकशीसाठी ईडीने बोलावणे होते. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले होते. परंतु दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास …

Read More »

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता असंघटीत कामगारः वर्षभरात पुन्हा बदली राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मागील काही वर्षापासून सततच्या बदल्यांमुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली. वर्षभरात बदली झालेले तुकाराम मुंढे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची …

Read More »

मंत्रालयातील आयएएस दांपत्याच्या तरूण मुलीने केली आत्महत्या इमारतीच्या १० व्या मजल्याववरून रात्री ३ वाजता उडी मारून आत्महत्या

मंत्रालयात सनदी अधिकारी असलेल्या पती पत्नी अधिकाऱ्यांच्या २६ वर्षीय मुलीने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. इतक्या रात्री पहाटे तीन वाजता इमारतीच्या १० व्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचे काय, इतक्या मध्यरात्री असे काय घडले की, मुलीने आत्महत्या केली अशी चर्चा …

Read More »

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल, असा गंभीर इशारा राजकीय विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिला. शुक्रवारी मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन अनुसुचित जाती/ जमाती/ विमुक्त …

Read More »

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अंशू सिन्हा यांची नियुक्ती महाराष्ट्र बाल हक्क आयोगावर करण्यात आली आहे. तर दिलीप गावडे यांची डेअरी डेव्हलमेंटच्या …

Read More »

मंत्रालयासमोर सामुहिक आत्मदहन आंदोलनाच्या तयारीत असलेल्यांना घेतले ताब्यात

आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या विकासासाठी शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे म्हणून मंत्रालया समोर सामुहीक आत्मदहन करण्याच्या हेतूने मंत्रालयाकडे निघालेल्या १३ आंदोलकांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले. या विषयी प्राप्त माहितीनुसार ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’च्या वतीने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री, …

Read More »

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या …

Read More »