Breaking News

Tag Archives: मनोज जरांगे पाटील

नाना पटोले यांची टीका, जरांगे पाटलांचे… आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा भाजपाला इक्बाल मिर्चीशी संबंध असलेला व्यक्ती चालतो मग नवाब मलिक का चालत नाही?

“मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे.” या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे आयोग नियुक्त करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण त्या आरक्षणाविरोधात फडणवीसांच्या जवळचे लोकच कोर्टात गेले होते. मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असे फडणवीस …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, मुख्यमंत्री शिंदे खरं आहे म्हणाले तर मी राजकीय संन्याय घेईन मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकीची तारीख अद्याप जाहिर केलेली नसली तरी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा राज्यातील राजकिय वातावरण तापू लागले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरक्षणाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही दररोज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज …

Read More »

प्रविण दरेकर यांची टीका, खुनशी कोण हे महाराष्ट्राला दिसून आलेय संजय राऊतच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर बसवतायत

तुम्ही एवढे मोठे आंदोलन उभे करत असताना खुन्नस काय असतो हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले असते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करायला देताहेत. सुडाची भावना असती तर ते तसे वागले असते. परंतु ते लोकशाही मार्गाला मानणारे आहेत. तुम्हीच आंदोलनाआडून किती खूनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय. सर्वांना अरेतुरे करता. त्यामुळे खूनशी …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांचे मोठे वक्तव्य… तर आम्ही पाठिंबा देऊ ५० टक्क्यांच्या वरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्राने हे धोरण बदललं पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. शरद पवार पुढे …

Read More »

मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांच्या त्या आरोपावर म्हणाले, माझ्यासाठी धक्कादायक पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर

राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि इतर नेत्यांमध्ये आता चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे मनोज जरांगेच्या भूमिकेवरून रोज एका नेत्याकडून विविध पातळीवर भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस असा सामना रंगविण्यात येत असल्याचा …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांचे आवाहन मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जरांगेनी जाब विचारावा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा उपोषणाचे आंदोलन मागे घेत इथे सलाईन लावून मरण्यापेक्षा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढून मरू असे सांगत मला तुरुंगात टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा आहे. जर उद्या मला सरकारने तुरुंगात डांबले तर भाजपाची एकही सीट निवडून देऊ नका …

Read More »

जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नये भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे. माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचे भावनिक आवाहन, मला तुमची साथ हवीय राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा १३ जुलै पर्यंतची मुदतवाढ

मराठा आरक्षणप्रश्नावरून आता मराठा विरूध्द ओबीसी असा वाद निर्माण झाला असून मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या तयार करण्यात आलेल्या सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी १३ जुलै पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक …

Read More »

मराठा आरक्षण विषयाच्या अनुषंगाने येणा-या प्रश्नासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती निर्णय घेणार राज्य उत्पादन शुल्‍क मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती

मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचे उत्तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिले. शासनाकडे आलेल्या सगेसोयरेच्या हरकतीबाबत सरकारचा निर्णय झाला का, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना शपथपत्र देवून त्यांना प्रमाणपत्र द्यावे, …

Read More »