Breaking News

Tag Archives: महाराष्ट्र

भारत जोडो न्याय यात्रेचा उद्या १२ मार्च रोजी नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला …

Read More »

राज्यपालांच्या भेटीत नाना पटोले यांनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, जर्मनीला कुशल मनुष्यबळ देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार

जर्मनीला किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हावी. आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट, ओमकार कलवाडे यांच्या …

Read More »

राज्यपाल बैस म्हणाले, सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र…

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात ४७९ किमीचा प्रवास

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता १४ जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत आहे. भारत जोडो यात्रेतून देश जोडण्याचे जे काम झाले तेच काम या यात्रेतूनही होणार असून जनतेच्या न्याय हक्काला वाचा फोडण्याचे काम …

Read More »

महाराष्ट्राचा ब्रॅड ‘महानंद’ दूध आता गुजरातच्या दावणीला बांधला

केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर …

Read More »

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी …

Read More »

नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत

२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च आणि एप्रिल महिन्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्याची तयारी सुरु केली. तसेच काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असा चंग भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांधला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही …

Read More »

रेल्वे मंत्रालयाचे मुंबई महाराष्ट्राबाबतचे ते पत्र दाखवित मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल… रेल्वे स्टेशन स्थानकातील मोदींच्या ३डी फोटो सेल्फी पॉंईटची माहिती RTI मधून उघड

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने हिसकावून घेतली. त्यानंतर भाजपाने सरकारी योजना आणि सरकारी मालमत्तांचा वापर नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपाच्या प्रचारासाठी वापरण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसून येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्थानकांवर जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदी …

Read More »

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी …

Read More »