Breaking News

Tag Archives: महाविकास आघाडी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट इंडिया आघाडीची बैठक तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर केली सविस्तर चर्चा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया …

Read More »

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीचा घेतला आढावा ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन केली पाहणी

३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबई मध्ये होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस …

Read More »

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं…. अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यादाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे धुळे येथील मात्र वाय.बी.चव्हाण प्रतिष्ठान येथे आज रविवारी ३० जुलै रोजी इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, विरोधकांचे पत्र नव्हे ग्रंथच… जितक्या लक्षवेधी आलेल्या आहेत त्यातील मुद्दे उचलून पत्र पाठविलेले दिसते

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे पहिलेच तर शिंदे-फडणवीसांचे दुसरे पावसाळी अधिवेशन आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे-फडणवीस-पवार सरकारने प्रथेप्रमाणे विरोधकांना चहापान कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र राज्यासमोरील प्रश्नांची यादी वाचून दाखवित दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर विरोधकांनी पत्र पाठवित बहिष्कार टाकला. चहापानानंतर सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधारी मुख्यमंत्री …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतरही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपातील मोठ्या पक्षप्रवेशासाठी योजना तयार भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल

भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भिवंडी (जि.ठाणे) येथे प्रदेश भाजपातर्फे आयोजित महाविजय २४ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक फॉक्सकॉनने माघार घेतल्याने मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरही संशयाचे ढग

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती …

Read More »

आमदार रवि राणा यांचा खोचक टोला, मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाहीत आता तर… पावसाळी बेडकासारखे मतांची भीक मागत आहात

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना हनुमान चालीसावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपा समर्थक रवि राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर अमरावतीतीलच अचलपूरचे शिंदे समर्थक आमदार बच्चु कडू यांनाही शिंदे सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप करत एकच खळबळ माजवली. आता …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल :- एच. के. पाटील

महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून …

Read More »

नितेश राणे यांची टीका, राष्ट्रवादीच सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष संजय राऊत यांचे आता काँग्रेस लक्ष्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेना – भाजपा सोबत सरकारमध्ये सामील झाल्याने आता महाविकास आघाडी पूर्णपणे नामशेष झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रदेश प्रवक्ते अभिषेक मिश्रा,ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. अजित पवार …

Read More »

फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारांना….ते विकेट गेल्याचे सांगतायत आम्ही फसवलं पण तुम्ही का फसलात ? फडणवीसांवर पलटवार

एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच अचानक पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले. त्या मागे नेमके कोणं होतं याची उत्सुकता अद्यापही राज्यातील जनतेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »