Breaking News

Tag Archives: महाविकास आघाडी

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे त्यांचा मन:पूर्वक आभारी असल्याची भावना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स हॅंडलवर व्हीडिओ पोस्ट करुन व्यक्त केली. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सहभागी व्हावे किंवा नाही याबाबत अंतिम भूमिका …

Read More »

मविआतील वंचितच्या समावेशावरून रंगलेल्या राजकारणाचा पहिला टप्पा पूर्ण?

देशात लोकसभा निवडणूकीची घोषणा तसेच निवडणूकीसाठीची आचारसंहिता जाहिर होऊन जवळपास एक आठवड्याचा कालावधी झाला. त्यातच देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे या निवडणूकीत पूर्वीप्रमाणे एकाचवेळी दिसून येणारा प्रचाराचा धुराळा सध्या तरी सर्वच राज्यात दिसून येत नाही. मात्र पडद्या आड अनेक आघाड्या-बिघाड्यांचे राजकारण चांगलेच शिजत असल्याचे दिसून …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमचं टार्गेट ठरलेलं आहे…ती युती आता राहिली नाही

आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपाला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा गटाकडून वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून राज्यात भाजपाला सशक्त विरोध निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यादृष्टीने वंचित बहुजन आघाडीबरोबर सातत्याने जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप वंचित बहुजन …

Read More »

नाना पटोले यांची ग्वाही, महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय

महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे, वंचितसोबतही आजही चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचा खुलासा, सहा जागा मागितल्याची बातमी खोटी

वंचित बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात. त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. आज काही चॅनल्सने वंचित बहुजन आघाडीने सहा जागांचा प्रस्ताव दिल्याची …

Read More »

शाहु महाराजांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं…

आज सकाळपासून लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागांचा तिढा सोडविण्यावरून बैठक सुरु होती. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे हे शिवसेना उबाठा गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात असतानाच उद्घव ठाकरे यांनी श्रीमंत शाहु महाराज यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर श्रीमंत शाहु महाराज …

Read More »

महाविकास आघाडीत अजूनही चर्चेचे गुऱ्हाळः वंचित नव्या प्रस्तावावर उद्या निर्णय

काल दिवसभर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील संभावित मतदारांची नावे आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर अंतिम जागा वाटपाला मान्यता घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिवसभर दिल्लीत तळ ठोकून राहिले. त्यानुसार काँग्रेस श्रेष्ठींनी नाना पटोले यांच्या प्रस्तावाला मान्यता देत काँग्रेस १७ जागांवर दिल्लीच्या श्रेष्ठींनी मान्यता दिली. त्यानंतर आज महाविकास आघाडी आणि …

Read More »

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना चिंता पाच टप्प्यातील मतदानाच्या अंतराची

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक अर्थात लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर केले. त्यानुसार देशात ७ टप्प्यात मतदान घेणार आहे. तर महाराष्टात ५ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. देशातील काँग्रेस इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आणि भाजपाने एनडीए अर्थात महायुतीत सहभागी पक्षांना सोबत घेत आपापल्यापरीने महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आपल्या विचार …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, संजय राऊत खोटं बोलतायत

काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये १० जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सध्या प्रकाश आंबेडकर हे अमरावतीच्या दौऱ्यावर असून …

Read More »