Breaking News

Tag Archives: मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या उपनगरात संपूर्ण स्वच्छता

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबई च्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी …

Read More »

सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी राज्यपाल बैस बोलत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, सायन रुग्णालयात लवकरच १२०० खाटा…

तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि …

Read More »

मुंबईत नऊ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत ९ जानेवारी, २०२४ रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

झोपडीधारकांसाठी मोठी बातमीः पुनर्वसन सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात

झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या १ लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाते, आता ते ५० हजार रुपये घेतले जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका या गरीब झोपडीधारकांना विनामुल्य दिलेल्या असतात. त्याचे हस्तांतरण करताना …

Read More »

राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौका सागरी किनारा सुरक्षिततेसाठी

राज्यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्या नंतर गृह विभागानकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेचे उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाय योजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात ३० पोलीस बोटी कार्यरत आहेत आणि राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत. …

Read More »

अतुल सावे यांची घोषणा, परवडणाऱ्या घरांसाठी लवकरच नवीन धोरण

राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी नुकतीच केली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) च्यावतीने बांद्रा-कुर्ला संकुल मध्ये …

Read More »

गिरिष महाजन यांचे आवाहन, ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा

मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत २० ते २८ …

Read More »

भल्या पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना

शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना यावेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन …

Read More »

‘वंचित’ची २५ नोव्हेंबरच्या महासभेला राहुल गांधी यांना आमंत्रण

भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून येत्या २५ नोव्हेंबर रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी याना देण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली. बॅलार्ड पिअर्स येथील वंचितच्या राज्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर …

Read More »