Breaking News

Tag Archives: मुंबई

mumbai rain: मुंबईतील जनजीवन विस्कळीतः लोकल, रेल्वे पुर्वपदावर नाही ३०० मिमी पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, अद्याप पाणी पूर्ण ओसारायला तयार नाही

मध्यरात्रीनंतर उशीराने सुरु झालेल्या मुसळधार पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत राहिला. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला. सकाळचे ११ वाजले तरी साचलेले पाणी कमी व्हायला तयार नव्हते. यामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याने अनेक चाकरमानी वेळेवर घराच्या बाहेर …

Read More »

दिल्ली-मुंबईतील घरांच्या किंमतीत ५० टक्के वाढ अॅनारॉक च्या अहवालात नवी माहिती पुढे

रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मधील सरासरी घरांच्या किमती गेल्या पाच वर्षांत घरांची मागणी वाढल्याने किंमतीत जवळपास ५०% वाढ झाली आहे. अॅनारॉक Anarock च्या अहवालात असे दिसून आले आहे की दिल्ली-NCR मधील निवासी मालमत्तेची सरासरी किंमत जानेवारी-जून २०२४ मध्ये ४९% वाढून ६,८०० रुपये प्रति …

Read More »

झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार मंत्री अतुल सावे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची माहिती

झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात झोपू योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र लवकरच ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत. अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना – हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य भाई गिरकर यांनी प्रश्न …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा महायुतीने भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली

राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज करत अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहे. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …

Read More »

मुंबईतील घरांची मागणी कमी असूनही किंमती चढ्या दरानेच नाईट फ्रॅकच्या अहवालातील माहिती

मुंबईत मागील काही वर्षात घरांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. मात्र यातील अनेक घरे ही एक तर ती मध्यम आकाराची किंवा मोठ्या आकाराची असतात. तरीही या घरांच्या किंमती पाह्यल्या तर त्या जास्तच असल्याचे दिसून आले आहे. बरं या घरांच्या किंमती चढ्या जरी असल्या तरी घरांची मागणी कमी होत …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल म्हणाले, फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत पथदर्शी ठरेल ‘फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग’ विषयावर परिषद

देशात तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होत असून या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसेच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केला. भारतीय न्याय संहिता २०२३”, “भारतीय साक्ष अधिनियम, २०२३”, …

Read More »

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त; तीन सिलेंडर मोफत देणार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थात विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर करताना पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरामुळे इतर सर्वसामान्य मुंबईकरांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थसंकल्पात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल पंपावर मिळणारे पेट्रोल डिझेलच्या दरात घट करण्याचा निर्णय जाहिर केला. तसेच हा निर्णय १ …

Read More »

नाना पटोले यांची टीका, …बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण नक्कल करतानाही ७००० रुपयांची कमीशनखोरी

राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून हफ्ता वसुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन

पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ४५० ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात …

Read More »