Breaking News

Tag Archives: मुंबई

आशिष शेलार यांचा सवाल, खाजगी डम्पिंग ग्राउंड आँडिट झाले का? मोगरा आणि इर्ला नाल्याच्या सफाईची पहाणी

नाल्याचा गाळ वसईतील ज्या खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे, त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का? असा सवाल करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाई बाबत असमाधानी असल्याचे आज सांगितले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. आज …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, …उद्याची सकाळ उजडली तरी मतदान कराच

मुंबई आणि एमएमआर परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रावर वेळ लागत असल्याने मतदान न करताच परतत आहेत अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. हा वेळ जेणेकरून मतदारांनी मतदानच करू नये यासाठी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर माझे मतदारांना आवाहन आहे …

Read More »

मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी…आता कर्तव्य मुंबईकर मतदारांचे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या …

Read More »

मुंबईतील सर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची बंद राहणार

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात १८ मे रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते २० मे २०२४ रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन …

Read More »

मुंबई शहरातील २४ लाख ९० हजार २३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी …

Read More »

गजबजलेल्या मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो

नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथील ईस्टर्न फ्रि वे मार्गावरील एक अवास्तव होर्डींग कोसळून झालेल्या अपघातात १४ निष्पापांचा प्राण गेला. तसेच अनेक वाहनांचे नुकसान आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जाण्याची पाळी तीन दिवसांपासून या भागात आहे. मात्र आज संध्याकाळच्या पीक आव्हरला मुंबईकरांसाठी महत्वाची असलेल्या मेट्रोला बंद ठेवत आणि महामार्गावरील वाहतूक तिसरीकडे वळवित …

Read More »

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून …

Read More »

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डींग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत …

Read More »