Breaking News

Tag Archives: मुंबई

ईशान्य मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहिर

एक-दोन वर्षापूर्वी ईडीच्या नोटीसा आणि भाजपाचा वाढता दबाव यामुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. तसेच मुंबईतील अनेक खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र आता लोकसभा निवडणूकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असून …

Read More »

मुंबईत होत असलेल्या सागरी किनारा मार्गाची वैशिष्टे माहित आहेत का?

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होत असून वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. …

Read More »

मुंबई भाजपाकडून सहा डिजिटल प्रचार रथाचे उद्घाटन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज सहा डिजिटल प्रचार रथाला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयाच्या आवारात प्रचार रथ शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डिजिटल प्रचार रथाच्या माध्यमातून मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रातील …

Read More »

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही

मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला. मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे. लोकनियुक्त सदस्य महापालिकेत नसल्याचा फायदा घेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे. निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन रस्ते विकासाच्या निविदा अंतिम केल्याचे ७०० कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण आता समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सरकारने शोधला पाहिजे, अन्यथा जनतेच्या …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, विकसित भारत मुंबईकरांना कसा हवा?

विकसित भारत नेमका कसा असायला हवा? विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा-आकाशांचे चित्र उमटावे म्हणून मुंबई भाजपा थेट मुंबईकरांकडे जाऊन २ लाख सूचना गोळा करणार असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा तर्फे आजपासून देशभर …

Read More »

चंद्रकांत हंडोरे यांची ग्वाही, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचा संसदेत आवाज उठवू

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले. विधानपरिषद निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेले चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना …

Read More »

एमएमआरडीएच्या माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन

प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे जनतेचे सरकार आहे. या भूमिकेतून …

Read More »