Breaking News

Tag Archives: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजित पवार यांचे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर, हा निर्धाराचा अर्थसंकल्प हा अजित दादाचा वादा जिल्हा विकास निधीतून प्रत्येक जिल्ह्याला ई-पिंक रिक्षा

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्यास आवश्यक निधी, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेटः भेटीत या मुद्यांवर झाली चर्चा नागपूरच्या दिक्षाभूमीसह अनेक प्रश्नांवर झाली चर्चा

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. गायरानावरील घरांवर कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, १५०० रुपयात काय येणार? सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गुन्हे फक्त मोठ्या शहरांमध्ये वाढले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढले आहेत. हा माझा डेटा नाही, तो केंद्र सरकारचा डेटा आहे. देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी गृहमंत्री असल्याची …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्ता एक फुट खचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू रस्त्याला भेगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, पण महायुती सरकार तर १०० …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? डोंबिवलीनंतर नागरपूरातील कंपनीतही स्फोट

गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढे …

Read More »

किसान सभेचा आरोप, राज्याचा कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी पहिल्यांदाच केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,… टँकर भरण्यासाठी सोलर पंप वापरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे …

Read More »

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, जनता दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर पुणे अपघातप्रकरणी एसआयटी चौकशी दिशाभूल करणारी; बगलबच्च्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न

राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक …

Read More »