Breaking News

Tag Archives: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका,… ते पुन्हा अचानक कालावधी वाढवू शकतील…

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्या निकालात न्यायालयाने स्पष्टपणे आदेश देत विहित कालावधीत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. तरीही विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदत वाढ घेतली आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या वेळखावू पध्दतीच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. मात्र उद्या १० जानेवारी …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, राज्यात अनेक गंभीर समस्या, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्या

राज्यात पाणीटंचाई निर्माण होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक शनिवारी-रविवारी संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय करत आहेत. याव्यतिरिक्त राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्यावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. जयंत …

Read More »

नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९३ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदें कडून स्फोट दुर्घटनेवर शोक: मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस …

Read More »

माझी शाळा, सुंदर शाळा योजना समितीत या मंत्र्यांच्या ओएसडी, पीएचा समावेश जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी शासनाने जी समिती स्थापन केली …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?

जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी वाढता पाठिंबा पाहून पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. या प्रकरणावरून राजकिय वादंग पेटलेले असताना मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात …

Read More »

गृह विभागाला वाढत्या गुन्हेगारीकडे पाह्यला वेळच नाही, पण सरकारी कर्मचाऱ्यांची भलतीच काळजी

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे सरकार स्थानापन्न होऊन जवळपास १ वर्षे ६ महिने पूर्ण झाले असून २ ऱ्या वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. राज्य सरकारचा पंचवार्षिक कालवधीला पूर्ण होण्यास एक वर्ष राहिलेला आहे. परंतु विरोधकांकडून राज्य सरकारकडून राज्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचा व्यवसाय, वैयक्तिक …

Read More »

दिवाळी सुट्टीचा असर मंत्र्याच्या मनावरून उतरेना, मंत्रिमंडळ बैठकीचेही भान राहिना

वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. …

Read More »

मुख्यमंत्र्याचे विश्वासू भेटीला, अन मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा देत बीड आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या युवकांव कितीही गुन्हे दाखल केले तरी घाबरणार …

Read More »

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचाही निर्णय

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त …

Read More »