Breaking News

Tag Archives: मुख्यमंत्री

कोकण, पश्चिम घाट माथ्यावरील भात शेतीच्या नुकसानीचा आढावा घ्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कोकणातील तसेच पुणे,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागात अतिवृष्टी, पुरामुळे भातशेतीचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कटले असल्याने राज्य शासनाने या भागातील भातशेतीची पाहणी करून आवश्यकतेनुसार तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी पावले उचलावीत , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात भांडारी यांनी मुख्यमंत्री …

Read More »

शिर्डीत आलो अन कोल्हापूरात…केसरकरांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, या आमच्याकडे… शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांचा मिश्किल टोला

राज्यातील शिंदे गटातील आमदार मंत्र्यांना काय झालेय कळायला मार्ग नाही. शिंदे गटाचा एक आमदार सकाळी म्हणाला त्या स्त्रीचे सौंदर्य पाहून खासदारकी दिली. तर मंत्री म्हणतो शिर्डीत आलो अन् कोल्हापूरात पूराच्या पाण्यात एका फुटानेही वाढ झाली नाही. शिंदे गटाच्या या मंत्र्याचा मात्र अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टोला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागतिक बँकेने सहकार्य करावे; तर फडणवीस-दुष्काळमुक्त करणार महाराष्ट्राच्या सादरीकरणाने जागतिक बँकेचे शिष्टमंडळ प्रभावित

जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले असून भविष्यातही अनेक प्रकल्प उभारले जातील, पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमवेत हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, ठाणे – नाशिक महामार्ग आठ पदरी…. मुख्यमंत्र्यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी

ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना, तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे- नाशिक महामार्गावरील …

Read More »

वंचित-बीआरएसमध्ये युती? प्रवक्त्याने केला खुलासा बीआरएसकडून प्रस्ताव आल्यास वंचित विचार करेल

वंचित बहुजन आघाडी आणि बीआरएस या दोन पक्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी तेलंगणा आणि महाराष्ट्रात संभाव्य युतीसाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. तसेच बीआरएस कडून तेलंगणा किंवा महाराष्ट्रात अद्याप कोणताही प्रस्ताव …

Read More »

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आता मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी दिली शपथ

अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी २९ जुलै झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आज विधानसभेत निवेदन केले. महिलांची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे. फिरता निधी दुप्पट …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला, चिखल तुडवत गेलो…आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही…. इर्शाळवाडी भेटीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अलीकडेच दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी बचावकार्य सुरु असताना अनेक राजकीय नेत्यांनी इर्शाळवाडीला भेट देत तेथील नागरिकांची भेट घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे विस्थापित झालेल्या आणि नातेवाईक गमावलेल्या कुटुंबियांची भेट घेत मी …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला धरले धारेवर, राष्ट्रपित्यांचा अवमान करणारा भिडे बाहेर कसा? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कारवाई कऱण्याचे सरकारला आदेश

एखाद्या व्यक्तीने जर देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात जर कोणी अवमानकारक टीपण्णी केली असेल तर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई सरकारने करायला हवी. मात्र सांगली येथील भिडे हा राष्ट्रपित्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करूनही त्याच्यावर राज्य सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. तो व्यक्ती अद्याप बाहेर कसा ? …

Read More »

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास …

Read More »