Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोणाचाही समावेश नाही

नाना पटोले यांची मागणी,… मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा बदलापूर प्रकरणी भ्रष्ट युती सरकारविरोधात काँग्रेस मविआचे राज्यभर मूक आंदोलन

बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर १५ दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत, सरकार मुली व महिलांचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शासन व प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत आहेत. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व गृहमंत्री …

Read More »

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, …तुमचं सरकार आल्यावर २०० ते २२५ विधानसभेच्या जागा लढविणार

आगामी विधानसभा नजरेसमोर ठेवत जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूकांची तयारी सुरु केली आहे. त्यात आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागे राहिले नाहीत. सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत वरळीत आदित्य ठाकरे यांच्या …

Read More »

बदलापूरप्रकरणी सरकारवर टीका करत शरद पवार यांनी दिली शपथ भरपावसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केले आंदोलन

बदलापूर प्रकरणी राज्य सरकारच्या विरोधात आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमख नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. आंदोलनावेळी शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्ये-पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी यांना शपथ दिली. तसेच राज्यातील …

Read More »

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मविआचे बंद ऐवजी काळ्या फिती आंदोलन शरद पवार, नाना पटोले आणि शिवसेना उबाठा कडून भूमिका जाहिर

बदलापूर मधील चिमूरडींवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला राजकिय हेतूनं प्रेरित झालेले आंदोलन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर हे आंदोलना राजकिय हेतूने प्रेरित होते हे दाखविण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने वक्तव्ये करण्यात येत आहेत. विरोधक महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंदचे आंदोलन हाणून पाडण्याचे प्रयत्नही सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि अजित …

Read More »

सुप्रिया सुळे यांनी विनंती, माझी सुरक्षा काढून घ्या… ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी द्या

मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलंय. बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. दरम्यान, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहलंय. या पत्रात त्यांनी माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा, अशी विनंती केली. सुप्रिया सुळे पुढे …

Read More »

महेश तपासे यांची टीका, महाराष्ट्रात लाडकी बहीण शक्ती कायदाविना असुरक्षित गुन्ह्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात नाही

महिला व मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये खुलेआम गर्द विक्री, जुगाराचे अड्डे या सर्व गोष्टी मुक्त पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात होतात व ह्या सर्व गोष्टींना राजाश्रय आहे की काय असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली. …

Read More »

जयंत पाटील यांचा खोचक सवाल,… पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता …

Read More »

महेश तपासे यांचा दावा, निवडणुकीआधी महायुती फुटणार…? भाजपाने अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले

सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी भाजपाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार स्थापन केले असा थेट घणाघाती हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपावर करत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने काढलेल्या जनसन्मान यात्रेत भाजपाने काळे झेंडे दाखविले. तर भाजपाचे …

Read More »

शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे

बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …

Read More »

शरद पवार यांची टीका, केंद्र सरकारने विरोधी पक्षनेते पदाचा आदर… राहुल गांधींना बसविले मागच्या रांगेत

काल स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बसण्यासाठी मागच्या रांगेतील जागा दिल्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाज माध्यमावरून एनडीए सरकारवर टिकेची झोड उठली असून काँग्रेसने सरकारची मानसिकता काय आहे याचा हा पुरावा असल्याचे म्हटले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »