Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार यांचा निशाणा, ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणली जातेय...

मुंबईतील शासकिय वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले. तसेच असल्या घटना राज्यात …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक… रोहयो आणि संजय गांधी निराधार योजनेवर केलेल्या जाहिरातीची अजित पवारांनी केली पोलखोल

सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे, त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलताना केला. भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही …

Read More »

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील कुस्तीगीर परिषदेत ब्रिजभूषणबाबत कोणती घेतली भूमिका? महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत महिला पैलवानांच्या बाजूने घेतली बाजू

सध्या संपूर्ण देशभरात राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह सरण यांच्या विरोधात महिला कुस्तीगीरांकडून दिल्ली येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाची चर्चा होत आहे. तसेच याप्रकरणी भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महिला नेत्या कोणीच बोलायला तयार नाहीत. तसेच काही अपवाद वगळता इतर नामवंत खेळाडू, राजकीय पक्षाचे नेतेही प्रतिक्रिया देण्यास उत्सुक …

Read More »

एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, …पण त्याची दिशा बदलली खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात अर्धातास चर्चा

भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री तथा स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज ३ जून रोजी नववा स्मृतिदिन. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर गेले. तेव्हा भाजपाच्या नेत्या, पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. यावेळी खडसे आणि मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर …

Read More »

केशव उपाध्ये यांचा सवाल, महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का? मंचर येथील घटनेवरून विचारला परखड सवाल

मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि खा सुप्रिया सुळे यांची भूमिका धर्माच्या आधारावर ठरते का , असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, मुंबई …

Read More »

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य, …कोण कोणाला भेटतो यांच्याशी आमचे देणेघेणे नाही अदानी-मोदींचे संबंध काय? आणि २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या …

Read More »

विरोधकांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मजकूर तपासून कारवाई करा कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची …

Read More »

सावित्रीबाई फुलेंविरोधात आक्षेपार्ह लिखाणप्रकरणी विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्र्यांची दाखल महापुरुषांवर गरळ ओकणाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे - विरोधी पक्षनेते अजित पवार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज भेट घेऊन …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेखन लिहिणाऱ्यांवर कारवाई करा छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर …

Read More »