Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

शरद पवार म्हणाले, तरुणांच्या विविध प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रा युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आज पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा ८०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हा कमी प्रवास नाही, ४२ ते ४५ दिवसांचा हा प्रवास आहे. युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरुणांना आत्मविश्वास देणारी ही …

Read More »

प्रविण दरेकर यांचा शरद पवार यांना सल्ला, बावनकुळे यांच्यावर टीका करू नका ज्येष्ठ नेते सोडून का गेले याचा विचार करावा

आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकिट जरी पक्षाने दिलं नसलं तरी त्यांना प्रदेशाचं नेतृत्व भाजपाच्या श्रेष्ठीनं दिलंय याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी करून देत आमच्या नेत्यावर टीका करू नये असा सल्लाही दिला. पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या …

Read More »

शरद पवार यांची भीती, कंत्राटी नोकरीत महिलांना संधीच मिळणार नाही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांचे प्रतिपादन

महिला धोरण, आरक्षण या विषयांवरील चर्चा आज येथे झाली. कर्तुत्वाचा वाटा फक्त पुरुषांकडे असतो हे चुकीचे असून तुम्ही स्त्रियांनी देखील आज दाखवून दिले की, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कर्तुत्ववान स्त्री नक्कीच बनू शकता. ‘प्रॉपर्टीत अधिकार’ याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नाही असे मला वाटते. माझ्याकडे सत्ता असताना आम्ही एक …

Read More »

निवडणूक आयोगासमोरील आजचा युक्तीवाद पवार विरूध्द पवार चा अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या निकालाचा संदर्भ

राज्याच्या राजकारणातील अभेद्य अशा पवार घराण्याचा प्रमुख सहभाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. समर्थक आमदारांनी कोण कोणासोबत हे जाहिर केल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी अजित पवार गटाचे वकील महेश जेठमलानी आणि काही नेते उपस्थित होते. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार मुळेच राष्ट्रवादीचा सर्वोदय … आता सुर्यास्त झालाय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडाच्या पार्श्वभूमी कधी महायुतीत बेबनाव आहे तर आता अजित पवार यांना डावलले जात असल्याच्या चर्चेला जोर वाढला आहे. यापार्शवभूमीवर सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर असलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत काही जण अस्वस्थ आहेत, अजित पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीचा सुर्यादय झाला होता. मात्र आता ते राष्ट्रवादीत …

Read More »

अदानी भेटले अजित पवार गेले भाजपासोबत आता शरद पवारच गेले अदानीच्या घरी भेटीवरून रोहित पवार यांचे वक्तव्य

राज्यात एकाचवेळी सत्ताधारी आणि विरोधकांशी तितक्याच घनिष्ट मैत्रीचे पालन करणारे आणि राजकारण आणि व्यक्तीगत मैत्री कोणतीही गल्लत न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रत्येक कृत्याचा अर्थ काढणे त्यामुळेच कठीण होऊन बसते. वास्तविक पाहता अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी आले ते पहिल्यांदा बारामतीत शरद पवार यांच्या एका संस्थेच्या …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, फोन आल्यानंतरच लाठीचार्ज, गोवारी हत्याकांड…. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच जालना येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. यावेळी भेटीनंतर आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यानंतर आयोजित …

Read More »

शरद पवार यांचे आव्हान, पंतप्रधानांनी नुसतेच आरोप करण्याला काय अर्थ… अजित पवार सोडून गेलेल्यावर केले भाष्य

आज इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने बैठकीशी संबधित चर्चेची रूपरेखा आणि तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यावरून अद्यापही संशय असल्याचा …

Read More »

शरद पवारांवरील प्रश्नाला उद्धव ठाकरे यांचे मिश्कील उत्तर, सोबत असणाऱ्यांवर आम्ही नेहमी… शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील टीकेवर पहिल्यांदाच भाष्य

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. या इंडिया आघाडीची उद्या गुरूवार ३१ ऑगस्ट रोजीपासून तिसरी दोन दिवसीय बैठक मुंबईत होत आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »