Breaking News

Tag Archives: राहुल गांधी

अमित शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांचा तिरंग्याखाली निवडणूका जम्मू काश्मीरला तीन कुटुंबानी लुटले

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांमधील सामन्यातील रंगत वाढत चाचली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या फारूख अब्दुला यांच्या नॅशनल काँन्फरन्सच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यासभेत बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देणार असल्याचे आश्वासन …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका,… अराजक पसरवण्याचे ‘मविआ’ चे कारस्थान काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या केलेल्या अवमानाबद्दल राहुल गांधी बोलणार का ?

महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना परखड सवालही करत …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, या तीन कारणामुळे मोदींनी माफी मागितली… महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी

नौदल दिनाचे औचित्य साधत सिंधूदुर्गातील मालवण येथे २८ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परंतु या पुतळ्यास आठ महिन्याचा कालावधीही होत नाही तोच हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील जनतेत एकप्रकारची संताप व्यक्त झाल्याचे पाह्यला मिळाले. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीने या प्रकारावरून निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे भाकित, मविआचे सरकार आले की, मोदी सरकार जाणार डॉ. पतंगराव कदमांच्या 'लोकतीर्थ' स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशा-यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार …

Read More »

राहुल गांधी यांचा विश्वास, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देणार जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना दिला विश्वास

स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याचा असलेला राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रीय प्रदेश बनविण्याचा प्रयत्न सुरु असून हा प्रयत्न हाणून पाडू आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ असा विश्वास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांची माफी मागतानाही राहुल गांधींवर टीका स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या अवमानाचा शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची तुलना

शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून दैवतासमोर अनेकवेळा झुकले तरी आम्हाला त्याचे वावगे नाही. सिंधूदुर्गात मागील काही दिवसात जी घटना घडली. त्या घटनेबद्दल मनात खेद आहे. तसेच या घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची पायाशी डोकं ठेवत त्यांची माफी मागत असल्याचे सांगत काहीजण स्वातंत्रवीर वि दा सावरकर यांचा अवमान करतात परंतु …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मिस इंडियात एकही दलित आदिवासी ओबीसी महिला नाही जणगणना करण्याची गरज

मिस इंडिया ब्युटीसाठी निवड झालेल्यांची यादी मी पहात होतो, पण त्या स्पर्धेत एकही दलित, आदिवासी किंवा ओबीसी समाजातील एकही महिलेची निवड करण्यात आली नव्हती असा हल्लाबोल काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मिस इंडियाची यादी तपासली की …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, … आरक्षण संपवणे हीच मोदींची गॅरंटी आयएएसच्या खाजगी करणाचा प्रयत्न

केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या प्रशासनातील काही महत्वाच्या पदांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता होती. मात्र या रिक्त आयएएसच्या जागांवर मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करण्याच्या अनुषाने एक अध्यादेश काढत, अशा रिक्त पदांवरील व्यक्तींची नियुक्ती मागील दाराने करण्याचा मार्ग मोकळा केला. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक …

Read More »

शरद पवार यांची टीका, केंद्र सरकारने विरोधी पक्षनेते पदाचा आदर… राहुल गांधींना बसविले मागच्या रांगेत

काल स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बसण्यासाठी मागच्या रांगेतील जागा दिल्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाज माध्यमावरून एनडीए सरकारवर टिकेची झोड उठली असून काँग्रेसने सरकारची मानसिकता काय आहे याचा हा पुरावा असल्याचे म्हटले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी शेवटून दुसऱ्या रांगेत मुख्य पहिल्या रांगेत मात्र सत्ताधारी मंत्री आणि ऑलिंम्पिक विजेते खेळाडू

भारतीय स्वांतत्र्याला आज ७८ वर्षे पूर्ण होत असून या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आतापर्यंत देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमाला आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि विरोधी पक्षातील सन्मानिय सदस्यांची नेहमीच पुढच्या रांगेत आसन …

Read More »