Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूक २०२४

ठाण्यात बोगस मतदान, चुक लक्षात आणून देताच मतपत्रिकेद्वारे मतदान करवून घेतले

२५- ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८-ठाणे विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २७३ मध्ये एक मतदार मतदान करणेसाठी गेला असता, त्यांचे ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचे मतदान केंद्र क्रमांक २७३ चे मतदान केंद्राध्यक्ष यांचे निदर्शनास आले. त्यानंतर मतदार यांचे ओळखीची खात्री करुन मतदाराला भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भारतीय रेल्वेचे ७० टक्के खासगीकरण

भारतीय जनता पक्षाला माझे आव्हान आहे की, मी जी माहिती देत आहे ती खोटी आहे म्हणून सांगा. २०१४ ला भारतीय रेल्वे १०० % सरकारची आणि भारतीयांची होती. २०२४ मध्ये निवडणुका होत आहेत, या दहा वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेचे ७०% खासगीकरण झाले आहे, ३०% च सरकारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे …

Read More »

मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी…आता कर्तव्य मुंबईकर मतदारांचे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या …

Read More »

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

‘एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी २० मे २०२४ रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांशी जिल्हाधिकारी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या त्या हेट स्पीच प्रकरणी न्यायालयाने मागवला अॅक्शन टेकन रिपोर्ट

२१ एप्रिल रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणाबद्दल दिल्ली पोलिसांनी केलेल्या तक्रारीवरून दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. तक्रारदार, कुर्बान अली यांनी आरोप केला आहे की, हे भाषण आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देते आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी विधाने …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, ४ जूनपासून जुमला पर्व संपणार…

महाराष्ट्रातील पाचव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी २० मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यासाठी आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वतीने ग्रॅड हयात येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवार यांनी काँग्रेसची भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा टोला, बुलडोझर संस्कृती भाजपाची, काँग्रेसची नाही

नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा इशारा, … तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु हिंदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश, पाकिस्तान सारखी परिस्थीती होऊ देणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवू. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले तरी ते संविधानाला हात लावू …

Read More »

मतांच्या रिअलटाईम टक्केवारीबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१७ मे) भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) फॉर्म 17-C च्या स्कॅन केलेल्या प्रती आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश मागणाऱ्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. निवडणुकीनंतर लगेचच बूथमध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येची माहिती तातडीने जाहिर केली जात नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. असोसिएशन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल प्रकरणी आदेश राखून ठेवला

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की अरविंद केजरीवाल यादरम्यान ट्रायल कोर्टाकडून जामिनासाठी अर्ज करण्यास स्वतंत्र असतील. २१ मार्च …

Read More »