Breaking News

Tag Archives: वाढवण बंदर

पंतप्रधान मोदी यांची आशा, वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ

देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ …

Read More »

वाढवण बंदर असणार जगातील १० मोठ्या बंदरापैकी एक बंदराच्या उभारणीसाठी ७६ हजार २०० कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली

महाराष्ट्रात वाढवण बंदर उभारणी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत. जगातील १० मोठ्या बंदरापैकी वाढवण हे एक मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे …

Read More »

वाढवण बंदर रद्द, पेसा भरती, शेतमालाला हमी भाव प्रकरणी कॉ विनोद निकोले यांचे आंदोलन विधान भवनाच्या पायऱ्यावर केले आंदोलन

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असता पहिल्याच दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १२८ डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी वाढवण बंदर, पेसा भरती आणि शेतमालाला हमी भाव या प्रश्नी विधानभवनात फलक झळकवत जिल्ह्यातील विविध मागण्यांप्रश्नी आंदोलन केले. यावेळी आमदार निकोले यांनी आमची एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द, …

Read More »

वाढवण बंदराला विरोध असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला शिवसेना उबाठा गटाने सातत्याने विरोध केला आहे. तर तसेच काँग्रेसनेही स्थानिकांच्या प्रश्नावरून वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या वाढवण बंदराच्या उभारणीला स्थानिकांसह राजकिय पक्षांचा विरोधही वाढत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले, वाढवण बंदराला या ८ मुद्यांमुळे स्थानिकांसह आमचाही विरोध

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी आमदार निकोले म्हणाले की, वाढवण बंदर …

Read More »

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक

वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्व‍िरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व …

Read More »