Breaking News

Tag Archives: विद्यार्थी

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, NEET परिक्षेत ००१% निष्काळजीपणा नको अन्यथा… NEET परिक्षेबाबत एनटीएला दिली तंबी

सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांना स्पष्ट केले की अंडरग्रेजुएट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आयोजित करताना कोणालाही “.००१% निष्काळजीपणा” नको आहे. त्यामुळे (NEET-UG) २०२४ परिक्षा वाचणार आहे. “कोणाच्याही बाजूने .००१% निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे,” न्यायमूर्ती एस.व्ही. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या …

Read More »

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून …

Read More »

शाहु महाराज योजनेतंर्गत परदेशी शिक्षणाच्या संधी: १२ जुलैपर्यंत अर्ज करा सामाजिक न्याय विभागाचे अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन अर्थात शिक्षण घेण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी १२ जुलै २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने २०२२ च्या NEET-PG च्या प्रश्नांसंदर्भातील याचिका फेटाळली याचिका प्रलंबित ठेवता येणार नाही

नुकताच NEET-UG परिक्षेचा निकाल जाहिर झाला. मात्र या परिक्षेच्या निकालात अनेक नियमबाह्य गोष्टी घडल्याचे उघडकीस आले. या विरोधात देशातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली, त्यावेळी १७ मे रोजी, समान सवलती मागणाऱ्या दुसऱ्या याचिकेवर विचार करताना, सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG परीक्षेच्या निकालाच्या घोषणेला स्थगिती देण्यास नकार …

Read More »

अंबादास दानवे यांची मागणी,… शैक्षणिक आराखड्याच्या अभिप्रायसाठी मुदत वाढ दया शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडे लेखी पत्राद्वारे केली मागणी

राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी व परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन …

Read More »

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू …

Read More »

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज करा

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे. सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व …

Read More »

उच्च न्यायालयाचा निर्णयः शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा

शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा कारण ही सुविधा विद्यार्थ्यांना दिली जात आहे, जी प्रयोगशाळेच्या शुल्कासारख्या इतर शुल्कांपेक्षा वेगळी नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वर्गातील वातानुकूलनासाठी दरमहा ₹ २,००० शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळेविरुद्धची जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून …

Read More »

३ री आणि ६ वीच्या विद्यार्थ्यांना नवी पाठ्यपुस्तके मिळणार

केवळ इयत्ता ३ री आणि ६ वी मधील विद्यार्थ्यांनाच २०२४-२५ या आगामी शैक्षणिक वर्षासाठी नवीन पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात CBSE ने २२ मार्च रोजी बोर्डाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना एका परिपत्रकान्वये कळविले. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT द्वारे नवीन पाठ्यपुस्तके तयार केली …

Read More »

विद्यार्थ्यांना द्यायच्या दुधाच्या पुरवठ्यातून ३३ कोटींची बचत

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हे, तर उलट त्यातून ३३ कोटी रुपयांची बचत होत आहे. शिवाय, या दरात प्रत्येक आश्रमशाळेपर्यंत दूध पोहोचविण्याचा खर्च सुद्धा अंतर्भूत आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ३० डिसेंबर २०२० …

Read More »