Breaking News

Tag Archives: शिवसेना उबाठा

मुंबई जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक संपली, पण निर्णय… विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांच्या चर्चेला वेग

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जागा वाटपाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध जागांवर शिवसेना उबाठा गटाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाकडून दावा करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाची कोंडी आज तरी निदान फुटू शकली नाही. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मोडतो़ड तांब्या-पितळ सारखी आमची आघाडी नाही महाविकास आघाडीत जागा वाटपांवर ९९ टक्के सहमती

महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे.  मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याशी काँग्रेस, उबाठा सहमत आहे का? काश्मीरसाठी स्वतंत्र झेंडा, ३७० वे कलम पुन्हा लागू करू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, ३७०, ३५ (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उबाठा सहमत आहेत का असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, आजचं आंदोलन हे विकृत विरूध्द संस्कृती… भरपावसात बदलापूरप्रश्नी शिवसेना उबाठाची सरकारच्या विरोधात निदर्शने

बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी स्थानिक बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात जनप्रक्षोभ बाहेर आला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यास अटकाव केला. तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात काळ्याफिती आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनजवळ …

Read More »

उद्धव ठाकरे यांची घोषणा, मी स्वतः तोंडाला काळी फित लावू बसणार जी तत्परता दाखविली, तशी न्याय देण्यातही दाखवा

बदलापुर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली. परंतु राज्यातील महायुती सरकारला धडकी भरताच सरकार पुरस्कृत लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकिय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असा निकाल दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत …

Read More »

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोर्टाची ती ऑर्डरच दाखविली मावळ मधील आरोपीला २०२४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावल्याची दिला संदर्भ

बदलापूर येथील अत्याचाराच्या विरोधात उसळलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, बदलापूरचे आंदोलन राजकिय हेतूने प्रेरित होते. या आंदोलनात बाहेरील लोक सहभागी झाले होते, तर स्थानिक लोक बोटावर मोजण्याइतके होते. त्याचबरोबर दोन महिन्यापूर्वी अशाच एका प्रकरणात राज्य सरकारने फाशी दिल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून …

Read More »

उद्धव ठाकरे यांची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची एसआयटी मार्फत चौकशी करा एकनाथ शिंदे यांच्या दोन महिन्यातील फाशीच्या शिक्षेच्या वक्तव्यावरून केली मागणी

बदलापूरातील दोन चिमुकल्यावर कथित अत्याचार केल्या प्रकरणात आरोपीला वाचविण्यात शाळा प्रशासनाबरोबरच पोलिस प्रशासनाने दिरंगाई केल्याची माहिती पुढे आली. तसेच शाळेच्या विश्वस्त पदांवर सर्व सत्ताधारी पक्षाशी संबधित असल्याची माहितीही पुढे आली. त्या विरोधात बदलापूरातील रहिवाशांकडून स्वयंपूर्तीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करताना आंदोलन राजकिय हेतून प्रेरित …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, …हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ? राज्यात स्पर्धा परीक्षांच्या घोळाप्रमाणे उद्योगांचे घोळ

‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. …

Read More »

अंबादास दानवे म्हणाले, लाडक्या बहिणी पेक्षा सुरक्षित बहीण हवी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात “लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी” या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक डॉ. …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, …सत्ता नियंत्रित करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न देशाच्या इतिहासातील नेहरु-गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही: शरद पवार

राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता, मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह …

Read More »