Breaking News

Tag Archives: शिवसेना उबाठा

अंबादास दानवे यांचा खोचक टोला, बेजबाबदार वागणाऱ्या महायुती सरकारला बाय बाय… महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांचा निर्धार

शेतकरी व जनतेच्या प्रश्नांकडे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदारपणे वागत आहेत. सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय वातावरण तापवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. एकप्रकारे राज्याला अधोगतीकडे नेण्याच काम महायुती सरकार करत असून या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असून महायुती सरकारला बाय बाय करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »

भाजपाला विश्वास, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार महायुती सरकारच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाचा विरोध आदित्य ठाकरे यांचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र

मुंबईतील मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्ट बसकडून दर भाडेवाढीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या अनुषंगाने बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाने विरोध केला असून मुंबईतील बस सेवा पुन्हा एकदा कोलमडून पडण्याच्या स्थिती असल्याचे सांगत मुंबईकरांना त्रास होऊ नये आणि बेस्टला आर्थिक निधी द्यावा यासाठी शिवेसना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे …

Read More »

अनिल परब यांची मागणी, नवीन इमारतीत ५० टक्के घरे मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा विधानभवन सचिवालायाकडे अशासकिय विधेयक सादर

घरे नाकारल्यामुळे मराठी लोकांचे मुंबईतून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. तसेच अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के …

Read More »

पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांची मागणी

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर एमएचटी-सीईटीचा खुलासा; परिक्षा पारदर्शकच आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेत केला खुलासा

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे. ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी …

Read More »

आदित्य ठाकरे यांची मागणी, CET परिक्षा घोटाळयाची चौकशी करा परिक्षा पेपर मध्ये ५४ चुका विध्यार्थ्यांची उत्तर पत्रिका, मार्क जाहीर करा

सध्या देशात एनईईटी परिक्षेच्या पेपर लीक आणि मिळालेल्या मार्किंग वरून संबध देशभरात गदारोळ सुरु आहे. त्यातच या परिक्षेवरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून जवळपास १५ हून अधिक विद्यार्थ्यांनी एनटीए परिक्षा पध्दतीविरोधात न्यायालयात दादही मागण्यात आली आहे. त्यातच आता नीट परिक्षेतही अशाच पध्दतीचा गोंधळ सुरु झाल्याने सीईटी परिक्षेत ५४ चुका असून …

Read More »

अनिल परब यांचा आरोप, मिंधे आणि भाजपाने १२ हजार मतदारांची नावे बाद केली पदवीधर मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी निवडणूक आयोगाची मदत

मुंबई, कोकणातील विधान परिषदेवर निवडूण जाणाऱ्या निवडणूकीत आता चांगलीच रंगत निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाने नोंदविलेली १२ हजार मते मिधे अर्थात शिंदे गटाने आणि भाजपाने बाद ठरविल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. …

Read More »

वाढवण बंदराला विरोध असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला शिवसेना उबाठा गटाने सातत्याने विरोध केला आहे. तर तसेच काँग्रेसनेही स्थानिकांच्या प्रश्नावरून वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या वाढवण बंदराच्या उभारणीला स्थानिकांसह राजकिय पक्षांचा विरोधही वाढत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, पुछता है भारत म्हणणाऱ्यांना देश आता पुसून टाकतोय शिवसेनेला संपवायला निघालेल्यांसोबत आम्ही कधीही जाणार नाही

लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेना उबाठा गटाने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे हे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे आपल्या अध्यक्षीय …

Read More »