Breaking News

Tag Archives: शिवसेना

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, राज्यात महागळती सरकार घोषणाच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढा मग कळेल किती अमलबजाणी किती झाली ते कळेल

राज्यातील महायुतीचे की डबल इंजिन सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील प्रत्येक जण म्हणतोय या सरकारला बाय बाय करायची वेळ आली आहे. मात्र मी म्हणेन की राज्यातील हे महागळती-लिकेज सरकार आहे अशी खोचक टीका शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत या सरकारच्या काळात पेपर फुटी झाल्या …

Read More »

संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …

Read More »

शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …

Read More »

अंबादास दानवे यांची मागणी,… शैक्षणिक आराखड्याच्या अभिप्रायसाठी मुदत वाढ दया शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडे लेखी पत्राद्वारे केली मागणी

राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी व परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन …

Read More »

अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार

मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र …

Read More »

दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी

मुंबईतील असली नसली शिवसेनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सातत्याने शिवसेना उबाठा गटावर आणि राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपाला प्रखर विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह …

Read More »

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी चावी देती ते तेवढेच बोलू शकतात परंतु …

Read More »

महायुतीतील शिंदे गटावर जाहिर केलेल्या उमेदवारांची नावे घेतली मागे

महायुतीतील भाजपाच्या वरचष्म्यामुळे शिवसेना शिंदे गटाने जाहिर केलेल्या चार उमेदवारांची नावे मागे घेण्याची पाळी शिंदे गटावर आली आहे. आधीच शिवसेना शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांची नावे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी जाहिर करण्यावर भाजपाचा आक्षेप होता. तसेच काही उमेदवार पराभूत होणार असल्याचा अहवाल भाजपाच्या हाती होता. त्यामुळे विद्यमान खासदारांना पर्यायी नावांचा प्रस्ताव …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत

मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला असा उपरोधिक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची …

Read More »