Breaking News

Tag Archives: शेतकरी

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी

मागील दोन दिवस विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी …

Read More »

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य वाटप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४ हजार १९४.६८ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या १० सप्टेंबरपासून अर्थ सहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…निवृत्ती योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत तर शाळेत मुलीही सुरक्षित नाहीत. आता तर कायद्याचे रक्षक पोलीसही सुरक्षित राहिले नाहीत. मुंबईतील माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी १३ पोलिसांच्या घरावर दरोडा पडला व …

Read More »

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार: योजनेचा विस्तार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,…शेतकऱ्यांच्या नावानेही पैसा खाल्ला न्यायालयाने वेळेत निकाल दिला असता तर राज्य सरकारचा निकाल लागला असता: बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांच्या भारत जोडो व भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. पण विधानसभेची लढाई सोपी नाही. केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता आहे. धनशक्ती व सत्तेचा गैरवापर करण्यात महायुती कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गाफील राहू नका. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही …

Read More »

देशाची नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल

देशातील शेतकरी बंधू-भगिनींना सबळ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. याच अनुषंगाने, दिल्लीत पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या हवामानानुरुप आणि भरघोस पीक देणाऱ्या वाणांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत आज पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,…अन्यथा ही सरकारची मिलीभगत आहे का? शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर कारवाई नाही

व्यापारी बँका व काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नाही असे म्हणत असताना सरकारची आणि बँकांची ही मिलीभगत आहे का असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारच्या कारवाईच्या बडग्याला न भीता …

Read More »

२० लाख लीटर दुधाचे संकलन केले तरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३५ रूपये देणे शक्य पशु व दुग्धविकास मंत्री विखे-पाटील यांची माहिती

राज्‍यातील अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे असे आवाहन दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे. या प्रक्रीया केंद्रानी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्‍य होईल असा विश्‍वासही व्‍यक्‍त केला. राज्‍य सरकारने …

Read More »

खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर: स्पर्धक विजेत्यांची यादी राज्य सरकारकडून राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहिर

राज्यात खरीप हंगाम सन २०२३ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२३ …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, थकित वीज बील माफ करा शेतकऱ्यांसाठी मदतीचा आव हे महायुतीचे फेक नॅरेटीव्ह

केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी ३० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती …

Read More »