Breaking News

Tag Archives: शेतकरी

अजित पवार यांचे आवाहन, शेतकऱ्यांनो वापसा आल्यानंतरच पेरणी करा पीक कर्ज मिळण्याबाब निर्देश

राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा …

Read More »

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री मग या व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रार करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात आला. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकरी संकटात मरतोय आणि कृषी मंत्री परदेशात फिरतोय दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर विजय वडेट्टीवार केली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका

राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. असे असताना राज्यातील शेतकरी संकटात मरतोय तर राज्याचे कृषी मंत्री परदेशात फिरतायत अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा दाभाडे कुटुंबियांची विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली …

Read More »

केंद्राच्या कांदा निर्यात परवानगीमुळे शेतकऱ्यामधील रोष कमी नाहीतर वाढला

किमती आणि पुरवठ्याची चिंता लक्षात घेऊन केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याच्या जवळपास सहा महिन्यांनंतर, गेल्या शनिवारी किमान निर्यात किंमत $५५० प्रति टन आणि वर ४०% आकारणीच्या सावधगिरीने त्यांना ‘फ्री’ श्रेणीत परत आणले. १० दिवसांच्या कालावधीत कांदा निर्यातीवरील हा दुसरा महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल आहे. २५ एप्रिल रोजी, गुजरात फलोत्पादन आयुक्तांनी प्रमाणित …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी

लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, …लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, …

Read More »

राहुल गांधी यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक विमा योजनेची…

शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही. मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे …

Read More »

शरद पवार म्हणाले, शेतकरी वर्गात सरकारविरोधात प्रचंड नाराजी

राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार म्हणाले की, नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी …

Read More »

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, …

Read More »