Breaking News

Tag Archives: शेतकरी

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा, कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबत नाशिक जिल्ह्यातील विधान परिषदेचे माजी सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषी मंत्री मुंडे यांच्याकडे बैठकीचे मागणी केली होती. त्या …

Read More »

“शासन आपल्या दारी” म्हणणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना “शेतकरीपुत्राचे रक्तपत्र”

आमचा शेतकरी बाप रात्रं-दिवस शेतात राबतो. दिवसा वीज नसल्याने रात्री साप, विंचूंना न घाबरता पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जागतो. इतके करूनही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कापूस, सोयाबीनचा बाजारातील भाव कोसळले. आर्थिक अडचण वाढल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. ही व्यथा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या वाईरूई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची. …

Read More »

सुप्रिया सुळे यांचे आश्वासन,… सरसकट कर्जमाफी होईल भाजपाचं हे सरकार नसून दडपशाही

शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. आज या मोर्चाचा तिसरा दिवस असून या मोर्चाने बारामती मतदार संघातील दौड येथून मोर्चात राष्ट्रवादी …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या

गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …

Read More »

भाजपा आ. प्रविण दरेकरांच्या मागणीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

विधान परिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज कोकणातील आंबा, काजू उत्पादकांबाबत प्रश्न उपस्थित केला. कोकणात आंबा, काजू ही काही पिकं आहेत त्यावर प्रोसेसिंग आणि स्टोरेज करण्यासंदर्भात मोठी योजना किंवा घोषणा शासनाकडून अपेक्षित असल्याची मागणी दरेकरांनी केली. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आंबा, काजुची न मिळालेली विमा रक्कम …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, “मोठ मोठे आकडे सांगुनिया थकले, दिले नाही काही बळीराजा”

अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. परंतु अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सरकारने शेतकऱ्यांना ठोस काही दिले नाही. हिवाळी अधिवेशनाकडे बळीराजाचे डोळे लागलेले असताना ट्रीपल इंजिन सरकारने जुन्याच घोषणा नव्याने करून शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. शेतकऱ्यांना न्याय न देता अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला असल्याची टीका विधानसभा …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा टोला, …या निमित्ताने अघोषित आणीबाणी अनुभवली

कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माझे आणि आमच्या सहकाऱ्यांचे …

Read More »

कांद्यावरून शरद पवार यांची टीका, चुकिच्या धोरणामुळे… कष्टाला किंमत नाही

कांदा हे दिलदार शेतकऱ्यांचे पीक आहे, कांदा हे असे पीक आहे की, दोन पैसे त्याच्यात मिळतात त्यासाठी तुम्ही सर्व कष्ट करतात पण, दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवायचे अधिकार आहे या सर्वांमध्ये तुमच्या कष्टाला किंमत द्यावी ही भावना क्वचित ही नाही; केंद्र सरकारमध्ये जे सत्ताधारी बसलेले आहेत त्यांना मी जाऊन …

Read More »

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल. नाशिक आणि पुणे विमानतळांचा या योजनेत समावेश झाल्याने …

Read More »

५२ लाख शेतकऱ्यांसाठी १ हजार ६९० कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना २२१६ कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा २५ टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी १६९० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण …

Read More »