Breaking News

Tag Archives: सुधीर मुनगंटीवार

सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट) राज्य मासा घोषित पशुपालकांसह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी-केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला

देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून जाहीर …

Read More »

माजी राज्यपाल राम नाईक यांचे पहिल्या मत्स्योद्योग धोरण समितीच्या निमित्ताने पुर्नवसन धोरण समितीच्या अध्यक्ष पदी राम नाईक यांची नियुक्ती

भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदी केंद्र सरकारने नियुक्ती केली की सदर राजकिय व्यक्तीचे निवृत्तीचे वय सुरु …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार खाजगी संस्थेने आयोजित केला होता का?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना …

Read More »

मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांना या नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते आणि चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाणारे रविंद्र महाजनी यांचे तळेगांव दाभाडेजवळ असलेल्या आंबी गावी निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी चित्रपटसृष्टीसह राजकिय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी रविंद्र महाजनी यांच्याबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाकडून मिळणार घसघशीत बक्षिसे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृ्ष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, राज्यातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा…. युनोस्कोकडे ५९ गडकिल्ल्यांसाठी शासनस्तरावर प्रयत्न

राज्यातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन व व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे …

Read More »

५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट काढणार राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजभवनात अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा असाही सुसंस्कृतपणा, तो शरद पवार…अक्कल शिकवणार ओबीसी नेत्यांच्या सहभागावरून टीका करताना केला उल्लेख

शिवसेनेला फोडून राज्यात भाजपाप्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात आणल्यापासून राज्याच्या राजकारणातील वरचष्मा दाखविण्यासाठी कधी भाजपाच्या नेत्यांकडून तर शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर शेरेबाजी करताना अश्लाघ्य भाषेचा वापर करताना दिसून येत आहे. तर बरेच नेते शिवराळ भाषा वापरू लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा नेते आणि सांस्कृतिक …

Read More »

“ग्लोबल वॉर्मिंग” विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे युरोपियन डे समारंभात बोलत होते

भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेह देखील घट्ट व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर …

Read More »

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, प्रतापगड प्राधिकरणची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »