Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

अजित पवार यांची वाचाळवीरांना तंबी, योजनेसाठी महायुतीलाच मतदान करा सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या राहुल गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज काँग्रेस पक्षाकडून सत्तातारी भाजपा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना थेट तंबी दिली. तसेच आवाहन केले की, हा महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकरांचा …

Read More »

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर निवासी डॉक्टरांकरिता आवश्यक सोयी- सुविधांसाठी निधी देणार-'चिठ्ठीमुक्त घाटी' उपक्रमाचे कौतुक

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ‘चिठ्ठीमुक्त …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मराठवाड्याची सर्वक्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच ध्येय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा उत्साहात

कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात केले. येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र …

Read More »

… पण महायुतीत अजित पवार यांना बाजूला काढण्याच्या प्रयत्नात शिंदे आणि भाजपा एकत्रित विधानसभेला सामोरे जाणार

राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनंतर निवडणूकीच्या प्रत्यक्ष हालचाली सुरु होतील असे सांगत निवडणूकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यभात या महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करण्याच्या …

Read More »

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी यासाठी निविदेतील नियमावली त्या पद्धतीने तयार करण्यात आली. तसेच पराभवाच्या छायेत असलेल्या राज्य सरकारने सत्तेच्या शेवटच्या दिवसातही अदानी कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी पाठपुरावा केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत या कंत्राटाच्या अनुषंगाने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्री पदा पेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा… मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’

मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा खोचक सल्ला,… फडणवीस-शिंदेंनी अभ्यास करून बोलावे भाजपा व RSS हेच खरे आरक्षणविरोधी; आरक्षण व संविधानावर भाजपाने बोलूच नये

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरक्षणाला RSS चाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे अशी जाहीर वक्तव्ये …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ कुटुंबांना भेटून संवाद साधणार शिवसेना जनतेच्या घरी, आठवडाभरात १ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प

शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या अभियानात …

Read More »

मुंबई महापालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान माहिती अधिकार मधून माहिती आली बाहेर

मुंबई महापालिकेने एलेव्हेटेड मल्टीलेव्हल इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टीम (शटल आणि रोबो पार्कर सिस्टीम) मुंबादेवी येथे सुरु केली तर माटुंगा, फोर्ट आणि वरळी येथे कार्यादेश दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई पालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान झाले असल्याची तक्रार करत चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली …

Read More »