Breaking News

Tag Archives: केंद्रीय निवडणूक आयोग

हरियाणा भाजपा प्रदेशाध्यक्षाने पत्र लिहिताच निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख बदलली अमोस अमावस्या निमित्त तारीख बदलली

पाचवर्षी हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकदम घेण्यात आली. परंतु यावेळी महाराष्ट्र विधानसभेची मुदत पूर्ण होण्यास आणि महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस असल्याचे कारण पुढे करत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीत घेण्याचे संकेत दिले. तसेच हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका एकत्रित घेत असल्याचे जाहिर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी …

Read More »

शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे

बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरयाणा व जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झारखंड आणि महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम एकत्रित जाहिर करण्याची शक्यता

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर चार राज्यातील विधानसभा निवडणूका एकदमच होतील अशी अटकळ बांधली जात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी हरयाणा व जम्मू काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला. मागील काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली …

Read More »

राज्यसभेच्या १२ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या महाराष्ट्रातील जागांसाठी मतदान

देशभरातील विविध राज्यातून रिक्त होणाऱ्या १२ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडूण गेल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे ही मुंबईतून लोकसभेवर निवडूण गेल्याने त्यांचीही राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या …

Read More »

विधानसभा निडणूकीची प्रशासनाकडून तयारी सुरु; ऐन गणेशोत्सवात आचारसंहिता ? महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणार विधानसभेच्या निवडणूका

मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणूकीचा माहोल बनविण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरु झालेला आहे. सत्ताधारी महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून सध्या समाजातील विविध समाजघटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी जाहिरनाम्यातील अनेक घोषणा थोड्याशा बदल करत जाहिर …

Read More »

पद सोडण्यासाठी राज्य सरकारचा दबाव, दोन आयएएस अधिकारी… केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर राज्यातील निवडणूक मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार घटवण्याचे प्रयत्न

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या काम करण्याच्या पध्दतीवर संपूर्ण देसभरातूनच अविश्वास व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणूकीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश बाजूला सारत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार त्यात बदल करत आयत्यावेळी नवा अध्यादेश जारी केला. तसेच विविध पातळीवरून निवडणूक आयोगाचे काम संशयातीत राहिले. …

Read More »

शरद पवार यांचे निवडणूक आयोगाला पत्र, पिपाणी चिन्ह यादीतून वगळा लोकसभा निवडणूकीत पक्षाला झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर लिहिले पत्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या चिन्हाला साधर्म्य असलेल्या चिन्हाचे वाटप निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना केल्याने मोठ्या प्रमाणावर मतांचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचे मताधिक्क कमी झाले. सातारा, बारामतीसह अन्य काही मतदारसंघात अशा पध्दतीने मतांची विभागणी झाल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, ईसी म्हणजे एनटायरली कॉम्प्रमाईस अनिल परब यांचा आरोप, १९ व्या फेरीनंजर मतमोजणीची प्रक्रिया डावलली

मुंबईतील उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाल्यानंतर या निकालावरून शिवसेना शिंदे गटाकडून आणि शिवसेना उबाठा गटाकडून दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आरोप करत न्यायालयात या निकालप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. …

Read More »

एलोन मस्क यांच्या ईव्हीएमबाबतच्या ट्विटला राहुल गांधी यांनी केले रिट्विट उदाहरणा दाखल रविंद्र वायकर यांच्या बातमीचा दिला दाखला

मागील काही वर्षापासून देशात ईव्हीएम मशिन्सबाबतचा संशय बळावत असून या मशिनबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशिन हॅक करता येत नसल्याचे छाती ठोकपणे सांगत आहे. मात्र देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या मेव्हण्यानेच फोनच्या माध्यमातून ईव्हीएम मशिन्समध्ये हस्तक्षेप केल्याचा नवी माहिती पुढे येत आहे. त्यातच …

Read More »

जयंत पाटील यांचा दावा, पिपाणी चिन्हाचा आम्हाला फटका तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही

देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक …

Read More »